अखेर पोलीस प्रशासनाने मालमत्ता कर भरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2017 12:39 AM2017-07-03T00:39:11+5:302017-07-03T00:39:11+5:30
नगर पालिकेला शंभर टक्के कर वसूलीचे शासनाचे उद्दिष्ट होते. कर वसुलीसाठी पालिका मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी
अशोक पारधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : नगर पालिकेला शंभर टक्के कर वसूलीचे शासनाचे उद्दिष्ट होते. कर वसुलीसाठी पालिका मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी सर्वतोपरी प्रयत्न नागरिकांनी प्रमाणिकपणे माचे २०१७ अखेर कराचा भरणा केला. पोलीस प्रशासनाने कराचा भरणा करण्यासाठी तत्परता दाखविली नाही. अन्य शासकीय कार्यालयाप्रमाणे मुख्याधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षकाचे कार्यालय सील केलेले होते. मुख्याधिकारी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करुन कारवाई सुरु केलेली होती. सर्व प्रयत्न केल्यानंतर जून अखेर पोलीस प्रशासन नरमले त्यांनी पालिकेला थकीत करापोटी एक लाख ४४ हजार ८३२ रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी न.प. पदाधिकारी व कर्मचारी यांना विश्वासात घेवून पालिकेच्या थकीत कराची व नियमित कराची मोठ्या प्रमाणात वसुली केलेली होती. वसूलीस दाद न देणाच्या वैयक्तिक व कार्यालयीन मालमत्ता धारकांविरुध्द कारवाई करुन शेरा ओढवून घेतलेला होता.
पोलिसांनी तक्रार दाखल करुन गुन्हा नोंदविला होता. मुख्याधिकारी यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून अटक करण्याचा देखील प्रयत्न केला. मुख्याधिकारी यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. न्यायालयाने त्यांना न्याय तर दिलाच पंरतु ज्यासाठी एवढा खटाटोप करावा लागला त्या पोलीस प्रशासनाने थकीत कराचा भरणा करण्यासाठी १ लक्ष ४४ हजार ८३२ रुपयांचा धनादेश मुख्याधिकारी माधूरी मडावी यांना सुपूर्द केला. अखेर पोलीस प्रशासन नरमले.