पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या मागावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 09:57 PM2018-12-07T21:57:56+5:302018-12-07T21:58:10+5:30
विविध गुन्हे करून पसार झालेल्या तब्बल २६ मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या मागावर तुमसर पोलीस आहेत. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विविध उपाय योजले असून ठाण्याच्या दर्शनी भागात फलक लावून त्यावर आरोपींचे फोटोही लावण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : विविध गुन्हे करून पसार झालेल्या तब्बल २६ मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या मागावर तुमसर पोलीस आहेत. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विविध उपाय योजले असून ठाण्याच्या दर्शनी भागात फलक लावून त्यावर आरोपींचे फोटोही लावण्यात आले आहेत.
तुमसर तालुक्यातील २६ आरोपी फरार असल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. विविध प्रकारचे गुन्हे करून यातील काही आरोपी तर २५ ते २६ वर्षापासून पसार असल्याचे दिसून येत आहे. आरोपींनी गुन्हा केला. गुन्ह्याची नोंद एकदा पोलीस ठाण्यात झाली तर पोलिसांच्या तावडीतून कुणाचीच सुटका होत नाही. आरोपी कितीही तरबेज असला तरी त्याचा शोध लागतोच. जिल्हा पोलीस प्रशासनाने फरार आरोपी व वॉन्टेड गुन्हेगारांचा छडा लावण्याचे निश्चित केले आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फरार आरोपींची यादी तयार करण्यात आली आहे. त्याचे फलक दर्शनी भागात लावण्यात आले असून त्यावर आरोपीचे नाव, ठाण्याचे नाव लिहिण्यात आले आहे.
तुमसर पोलीस ठाण्याच्या ठाण्यात दर्शनी भागावर लावण्यता आलेला मोठा बॅनर येणाऱ्या जाणाºयांचे लक्ष वेधून घेत आहे. आरोपी संदर्भात माहिती देणाºयांचे नाव गुप्त ठेवून असे नमूद केले आहे. आरोपींचा आतापर्यंत कसून शोध पोलिसांनी घेतला आहे. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. आरोपीबाबत गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे पोलिसांनी ही मोहिम हाती घेतली आहे. तुमसर शहर संवेदनशील म्हणून जिल्ह्यात ओळखले जाते. तुमसर शहरातून अनेक घटनांनी राज्याचे लक्ष वेधले होते.
फरार आरोपी व वॉन्टेड गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आता पोलीस खबºयांची मदत घेत आहे. तुमसर तालुक्यातील तुमसर, आंधळगाव, सिहोरा, गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपींचा २६ पसार आरोपीत समावेश आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ही मोहीम राबविण्यात येत असून यात कितपत यश येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.