अध्यक्ष, सचिवाला २४ पर्यंत पोलीस कोठडी
By admin | Published: September 24, 2015 12:48 AM2015-09-24T00:48:04+5:302015-09-24T00:48:04+5:30
वनविभागामार्फत गरजूंना देण्यात येणाऱ्या ग्राम परिस्थिती की विकास समिती (ईडीसी) च्या अध्यक्ष व सचिवांनी ९ लाख २९ हजार रुपयांचा गैरव्यवहार
प्रकरण ईडीसी गैरव्यवहाराचे : उमरझरी परिसरात प्रकरणाची चर्चा
साकोली : वनविभागामार्फत गरजूंना देण्यात येणाऱ्या ग्राम परिस्थिती की विकास समिती (ईडीसी) च्या अध्यक्ष व सचिवांनी ९ लाख २९ हजार रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी साकोली पोलिसांनी समितीचे अध्यक्ष अशोक पर्वते रा.शिवनटोला व सचिव वनरक्षक एम.जे. पारधी याला अटक केली असून दोघांनाही दि. २४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नागझिरा नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या जंगलाशेजारी गावातील लोकांनी जंगलाचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने ईडीसी योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत मोलमजुरी करणाऱ्या लोकांना उपजिवीकेसाठी आश्रय म्हणून दुधाळू जनावरे स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस देण्यात येते. हा निधी शासनामार्फत समितीच्या बँक खात्यात जमा होते. ही रक्कम अध्यक्ष व सचिवांच्या स्वाक्षरीने बँकेतून काढता येते. याच संधीचा फायदा घेत दोघांनीही ९ लाख २९ हजार रुपयांची अफरातफर केल्याची तक्रार सहाय्यक वनसंरक्षक अशोक खुणे यांनी पोलिसात दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अध्यक्ष व सचिवा अटक केली व न्यायालयाने या दोघांनाही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीत बरेच काही निष्पन्न होऊन या गैरव्यवहारात अजून किती जण गुंतले याची माहिती समोर येऊ शकते. (तालुका प्रतिनिधी)
ईडीसीची योजना लोकहिताची असून या समितीमधील पैशाचा गैरव्यवहार झाला आहे. हा गैरव्यवहार करताना लोकांचा विचारच करण्यात आला नाही. या प्रकरणाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केले. वेळीच लक्ष दिले असते तर कदाचित गैरव्यवहार झाला नसता. त्यामुळे पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी केली तर दोषी अधिकारी सापडतील.
- नेपाल रंगारी, जि.प. सदस्य.