आंतरराज्यीय प्रवेशद्वारावर पोलिसांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 01:11 AM2019-05-08T01:11:27+5:302019-05-08T01:12:12+5:30

मध्यप्रदेशाकडे जाणारा आंतरराज्यीय मार्ग तथा तुमसर-रामटेक-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर खापा चौकात पोलीस चौकी पुन्हा तैणात करण्यात आली असून वाहनांची तपासणी केली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जांभुरखेळा गावाजवळ भुसुरूंग स्फोट घडवला होता.

Police eye at interstate gateway | आंतरराज्यीय प्रवेशद्वारावर पोलिसांची नजर

आंतरराज्यीय प्रवेशद्वारावर पोलिसांची नजर

Next
ठळक मुद्देखापा चौकात पोलीस राहुटी : भुसुरूंग स्फोटानंतर पोलीस यंत्रणा सतर्क

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मध्यप्रदेशाकडे जाणारा आंतरराज्यीय मार्ग तथा तुमसर-रामटेक-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर खापा चौकात पोलीस चौकी पुन्हा तैणात करण्यात आली असून वाहनांची तपासणी केली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जांभुरखेळा गावाजवळ भुसुरूंग स्फोट घडवला होता. त्यात १५ जवान शहीद झाले होते.
त्या घटनेनंतर पोलिसांना ‘हाय अलर्टंची सूचना देण्यात आली होती. मध्यप्रदेशाच्या सीमा येथे भिडल्या असून कोम्बींग आॅपरेशन गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे नाकाबंदीचे निर्देश प्राप्त झाल्याची माहिती आहे.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्यात नक्षल चळवळी सक्रीय आहेत. दोन्ही जिल्ह्याच्या सीमा लागून असून मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्हा नक्षलग्रस्त आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जांभूरखेडा येथील भुसुरूंग स्फोटानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. यानंतर पोलिसांकरवी नक्षलवाद्यांचे कोम्बींग आॅपरेशन सर्च सुरू आहे. त्यामुळे जिल्हयातील पोलीस विभागाला सतर्कतेचा आदेश मिळाल्याचे समजते.
तुमसर तालुक्यातील आंतरराज्यीय मार्गाचे प्रवेशद्वार खापा येथे पोलिसांची राहुटी तीन दिवसापुर्वी तैणात करण्यात आली आहे.
यापूर्वी ही राहुटी येथून हटविण्यात आली होती. पुन्हा ती तैनात करण्यात आली आहे.
खापा चौकातून मध्यप्रदेशातील बालाघाट, वारासिवनी, कटंगी व गोंदिया-रामटेक-मनसर राष्ट्रीय महामार्ग जातो. हे स्थळ अतिशय महत्वाचे असून येथील चौकात यापूर्वीच सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावण्यात आले आहेत. पोलीस राहुटीत पोलिसांची तैणाती करण्यात आली आहे.
या मार्गावर रात्रीच्या सुमारास वाहनांचाही तपासणी करण्यात येत आहे, असे पोलीस तपासणी नाके बपेरा, नाकाडोंगरी येथेही पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. या सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
खापा चौकातील पोलीस चौकीमुळे इतरही असामाजिक तत्वांच्या वावराला निश्चितच आळा बसला आहे. खापा चौक तुमसर शहराचे मुख्य प्रवेशद्वार असून येथे कायम पोलीस चौकी रहावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

खापा चौकात पोलिसांची चौकी लावण्यात आली आहे. ती कायम ठेवावी. आंतरराज्यीय मार्गासोबत आता मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग घोषीत झाले आहे. पोलीस चौकीमुळे नियंत्रण प्रस्थापित होण्यास मदत होते. प्रवाशांनाही मदत होऊन सुरक्षतेची हमी यामुळे प्राप्त होते.
-विठ्ठलराव कहालकर, अध्यक्ष, राकाँ तुमसर-मोहाडी.

Web Title: Police eye at interstate gateway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस