भंडाऱ्यात चार जणांची नग्न धिंड काढणाऱ्या १७ आरोपींना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 06:54 PM2020-07-27T18:54:01+5:302020-07-27T18:56:57+5:30

जादूटोण्याच्या संशयावरून तालुक्यातील राजापूर येथे चौघांची नग्न धिंड काढून पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याच्या प्रयत्न करणाऱ्या १७ पुरूष आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी तर सात महिला आरोपींची सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

Police have remanded 17 accused in the case of burning in Bhandara | भंडाऱ्यात चार जणांची नग्न धिंड काढणाऱ्या १७ आरोपींना पोलीस कोठडी

भंडाऱ्यात चार जणांची नग्न धिंड काढणाऱ्या १७ आरोपींना पोलीस कोठडी

Next
ठळक मुद्दे राजापूरचे प्रकरणसात महिला आरोपी न्यायालयीन कोठडीत

भंडारा : जादूटोण्याच्या संशयावरून तालुक्यातील राजापूर येथे चौघांची नग्न धिंड काढून पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याच्या प्रयत्न करणाऱ्या १७ पुरूष आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी तर सात महिला आरोपींची सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान गावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पथकाने भेट दिली.

तुमसर तालुक्यातील राजापूर येथे शनिवारच्या रात्री चौघांची नग्न धिंड काढून माणुसकीला काळीमा फासण्यात आली होती. याप्रकरणी गोबरवाही पोलीस ठाण्यात कचरू राऊत यांनी तक्रार दिली. त्यावरून १७ पुरूष आणि सात महिलांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. रविवारी सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली. दरम्यान सोमवारी या सर्व आरोपींना तुमसर येथील दिवानी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने १७ पुरूष आरोपींना ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर सात महिलांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

सदर घटनेचा तपास आता तुमसर येथील ठाणेदार रामेश्वर पिपरेवार यांच्याकडे देण्यात आला असून त्यांनीच या सर्व आरोपींना न्यायालयापुढे हजर केले होते. पोलीस कोठडी मिळालेल्या सर्व १७ आरोपींना तुमसर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहेत. कोठडीदरम्यान या घटनेत कोण सहभागी आहेत, याचा शोध पोलीस घेणार आहे. दरम्यान दुसऱ्याही दिवशी राजापूर गावात स्मशान शांतता दिसून आली. चौकाचौकांत पोलीस तैनात करण्यात आले आहे.

अंनिसची चमू राजापुरात दाखल
अंधश्रद्धेतून घडलेल्या या प्रकरणाची दखल घेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीची एक चमू राजापूर येथे दाखल झाली. अंगात येणाºया संबंधित महिलेची भेट घेतली. तिच्या परिवाराचीही समजुत काढण्यात आली. या चमूने सदर महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची तयारी दर्शविली. मात्र कुटुंबियांची रुग्णालयात नेण्याची तयारीच दिसत नव्हती. अंनिसचे राहुल डोंगरे, कल्याणी भुरे, मनोज हुकरे, विजय केवट यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न चालविला आहे. 

Web Title: Police have remanded 17 accused in the case of burning in Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.