थर्टीफर्स्टच्या जल्लोषावर पोलिसांची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:31 PM2018-12-30T22:31:02+5:302018-12-30T22:31:35+5:30

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणांसह आबाल वृध्दात उत्साह संचारला आहे. तरुणांनी ठिकठिकाणी पार्टीचे नियोजन केले असून या थर्टीफर्स्टच्या उत्साहाला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांची करडी नजर राहणार आहे. जिल्हाभर पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार असून नववर्षाचे स्वागत मद्यप्राशनाने नव्हे तर दुग्ध प्राशन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Police have a stern look at the Thultfurst's funeral | थर्टीफर्स्टच्या जल्लोषावर पोलिसांची करडी नजर

थर्टीफर्स्टच्या जल्लोषावर पोलिसांची करडी नजर

Next
ठळक मुद्देजिल्हाभर चोख बंदोबस्त : नववर्षाचे स्वागत मद्य प्राशनाने नव्हे, दुग्ध प्राशनाने करा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणांसह आबाल वृध्दात उत्साह संचारला आहे. तरुणांनी ठिकठिकाणी पार्टीचे नियोजन केले असून या थर्टीफर्स्टच्या उत्साहाला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांची करडी नजर राहणार आहे. जिल्हाभर पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार असून नववर्षाचे स्वागत मद्यप्राशनाने नव्हे तर दुग्ध प्राशन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी अनेकांनी बेत आखले आहेत. काही जण पर्यटनस्थळावर जावून थर्टीफर्स्ट साजरा करणार आहेत. तर काहींनी आपल्या परिसरातच कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. मात्र या आनंदा अनेकजण मद्यप्राशन करुन हुल्लडबाजी करतात. वेगाने वाहन चालवून आनंदात विरजन घालतात. हा प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी जिल्हाभर चोख बंदोबस्त ठेवला आहे.
जिल्ह्यातील चारही उपविभागात जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू आणि अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत.
राष्टÑीय महामार्ग, प्रमुख राज्यमार्ग, मुख्य चौक, शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावर ३१ डिसेंबरच्या रात्री ८.३० वाजतापासून ते १ जानेवारीच्या पहाटे ५ वाजेपर्यंत नाकाबंदी करण्यात येणार आहे. यादरम्यान शहरात येणाºया व बाहेर जाणाºया वाहनांची काटेकोर तपासणी करण्यात येईल. दारु व अन्य मादक पदार्थांचे सेवन करुन वाहन चालविणाºया चालकांवर कडक कारवाई करण्यात येईल.
भंडारा शहरात नागपूर नाका, खात रोड, वरठी रोड, पोस्ट आॅफीस चौक, राजीव गांधी चौक, महात्मा गांधी चौक या ठिकाणी वाहतूक नियंत्रण शाखा व भंडारा पोलीस ठाण्याच्या वतीने नाकाबंदी करण्यात येणार असून याठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. यासोबतच ध्वनी प्रदुषणाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. कर्ण कर्कश आवाजात डीजे, लाऊडस्पिकर वाजविणाºयांवर कारवाई केली जाणार आहे. वेग मर्यादेचे पालन न करणाºयांवर कारवाई करण्यात येणार आहे. रात्रभर पोलीस गस्त घालणार असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी सज्ज झाले आहे.
तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी याठिकाणीही चोख बंदोबस्त लावण्यात येणार आहे. भंडारा उपविभागात उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, तुमसरमध्ये विक्रम साळी, पवनीत प्रभाकर तिक्कस नियंत्रण करणार आहे. महिला व मुलींना रात्री दरम्यान असामाजिक घटकांकडून त्रास होवू नये म्हणून विशेष ग्रस्तपथकाची स्थापना करण्यात आली आहे.
नववर्षाचे स्वागत करतांना खासकरुन तरुणांनी सयंम बाळगण्याची आवश्यकता आहे. मात्र अनेक तरुण गोंधळ घालत आपल्यासोबत दुसऱ्यांचाही जीव धोक्यात आणतात.
जिल्ह्यात कचेरीसमोर नववर्षाचे स्वागत
जिल्हा पोलीस दलाच्यावतीने १ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नववर्षाच्या स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक विनीता साहू, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा वाहतुक शाखा व सामाजिक संघटनातर्फे हा कार्यक्रम आयोजित आहे. नववर्षाचे स्वागत दुग्ध प्राशन करुन करण्यासाठी नागरिकांना सुगंधीत मसाला दुधाचे वाटप करण्यात येणार आहे. नागरिकांनी दारुच्या ऐवजी दुग्ध प्राशन करुन नवीन वर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Police have a stern look at the Thultfurst's funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.