पोलिसांना हेल्मेट सक्ती, सहा जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 09:37 PM2018-10-02T21:37:15+5:302018-10-02T21:37:34+5:30

हेल्मेटचा वापर न करणाऱ्या सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर मंगळवारी कारवाई करून त्यांच्याकडून तीन हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आाहे. पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना १ आॅक्टोबर पासून हेल्मेट सक्ती जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केली आहे. त्यावरून ही कारवाई करण्यात आली असून या नंतर लवकरच सामान्य नागरिकांवरही हेल्मेट न वापरल्यास कारवाई केली जाणार आहे.

Police helmet forced, action against six people | पोलिसांना हेल्मेट सक्ती, सहा जणांवर कारवाई

पोलिसांना हेल्मेट सक्ती, सहा जणांवर कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देतीन हजार दंड वसूल : लवकरच नागरिकांवरही होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : हेल्मेटचा वापर न करणाऱ्या सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर मंगळवारी कारवाई करून त्यांच्याकडून तीन हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आाहे. पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना १ आॅक्टोबर पासून हेल्मेट सक्ती जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केली आहे. त्यावरून ही कारवाई करण्यात आली असून या नंतर लवकरच सामान्य नागरिकांवरही हेल्मेट न वापरल्यास कारवाई केली जाणार आहे.
मोटार वाहन अपघातात सर्वाधिक मृत्यू हेल्मेट नसल्यामुळे होतात. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश शासनाला दिले आहेत. परंतु सामान्य जनतेवर कारवाई करण्यापूर्वी ज्यांच्यावर या कारवाईची जबाबदारी आहे त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. त्यासाठीच जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी १ आॅक्टोबर पासून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोटारसायकल चालविताना हेल्मेट सक्ती केली आहे. या संदर्भात मंगळवारी गृहविभागाचे उपअधीक्षक बी.डी. बनसोडे, वाहतूक पोलीस निरीक्षक गाडे व पथकाने कारवाई केली. सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून तीन हजार रुपये वसुल करण्यात आले. ही कारवाई यापुढेही चालू राहणार आहे.
पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसोबतच इतर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा हेल्मेट न वापरल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आयएसआय दर्जाचे हेल्मेट भंडारा पोलीस मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये बाजारभावापेक्षा स्वस्त दरात उपलब्ध असल्याचे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.
दुचाकी चालकांनो हेल्मेट वापराच
जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यातही दुचाकी अपघाताची संख्या सर्वाधिक आहे. हेल्मेट न वापरल्याने डोक्याला इजा होऊन मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करणे गरजेचे आहे. नागरिकांनी दुचाकी घेऊन बाहेर जाताताना आयएसआय दर्जाचे हेल्मेट परिधान करूनच प्रवास करावा. असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.

Web Title: Police helmet forced, action against six people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.