ठाणेदारांची आपदग्रस्त कुटुंबास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 05:00 AM2020-04-11T05:00:00+5:302020-04-11T05:00:19+5:30
काम करीत असताना दोन तार जोडून तिसरा तार जोडीत असताना करंट लागल्याने भाजला गेला व खाली पडला. त्यास लगेच करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथील डॉक्टरांनी भंडारा हलविण्यास सांगितले. प्रकृती चिंताजनक असल्याने भंडारा येथून नागपुरला रेफर करण्यास सांगितले असता नेतांना वाटेतच त्याने प्राण सोडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : करडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश वाजे यांनी माणुसकीचा परिचय देत जांभोरा येथील आपदग्रस्त कुटुंबाच्या घरी जाऊन मृतकाच्या कुंटुंबास पाच हजार रुपये रोख व दहा किलो तांदळाची थैली भेट दिली.
जांभोरा येथील अरविंद मडावी (३२) हा मोहगाव शेत शिवारात विद्युत खांबावरील तार कसण्याकरिता कंत्राटदाराकडे मजुरीने कामावर गेला होता. काम करीत असताना दोन तार जोडून तिसरा तार जोडीत असताना करंट लागल्याने भाजला गेला व खाली पडला. त्यास लगेच करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथील डॉक्टरांनी भंडारा हलविण्यास सांगितले. प्रकृती चिंताजनक असल्याने भंडारा येथून नागपुरला रेफर करण्यास सांगितले असता नेतांना वाटेतच त्याने प्राण सोडले.
अरविंद मडावी यांच्या कुटूंबात पत्नी, दिड वर्षाची मुलगी व एक चार महीण्याची मुलगी असून परीवारावर सकंट कोसळले. घरात पर्याप्त अन्नधान्य नव्हते. अशा कठीण परिस्थितीत आपदग्रस्त कुटुंबाला थोडीशी का होईना आर्थिक मदत मिळावी, या हेतूने करडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश वाजे यांनी त्यांच्या घरी जाऊन मृतकाच्या पत्नीला पाच हजार रुपये रोख व दहा किलो तांदळाची थैली भेट दिली.
यावेळी जांभोरा येथील सरपंच भुपेंद्र पवनकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शेखर हट्टेवार, पोलीस शिपाई गौरीशंकर गौतम, व गावातील नागरिक उपस्थित होते. जांभोरा ग्रामवासियांनी निलेश वाजे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.