रनिंग हातभट्टीवर पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 10:28 PM2018-12-31T22:28:05+5:302018-12-31T22:28:19+5:30

थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दारूची मागणी होत असल्याचे हेरून अनेकांनी हातभट्टीची दारू गाळण्याचा सपाटा लावला. यावर पोलिसांनी धाडी घालून नऊ जणांविरूद्ध कारवाई करत साडेचार लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Police raid on running hammer | रनिंग हातभट्टीवर पोलिसांची धाड

रनिंग हातभट्टीवर पोलिसांची धाड

googlenewsNext
ठळक मुद्देनऊ जणांवर कारवाई : साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दारूची मागणी होत असल्याचे हेरून अनेकांनी हातभट्टीची दारू गाळण्याचा सपाटा लावला. यावर पोलिसांनी धाडी घालून नऊ जणांविरूद्ध कारवाई करत साडेचार लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जवाहरनगर व कारधा ठाण्यांतर्गत येत असलेल्या नांदोरा नाला व जुना काचखेडा येथे पोलिसांनी धाड मारली. त्यावेळी दारूची विक्री करणारा आरोपी राजू भोलाजी सेलोकर (३२) शहापूर, दिनेश किसन मेश्राम (२५) रा. कचरखेडा यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून मोहाचा सडवा आणि इतर साहित्य असा एक लाख ३९ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. तर दुसऱ्या कारवाईत जितू रणभीड मेश्राम (३४) रा. संगम पुनर्वसन, विजय चंद्रभान मेश्राम (४०), युद्धराज बाबुराव मेश्राम (४५), मनोज रामचंद्र मेश्राम (४०), प्रशांत नंदलाल मेश्राम (२८), विष्णू निलकंठ सरादे (३६) आणि संदीप ज्ञानेश्वर मेश्राम (२५) यांना ताब्यात घेण्यात आले.
वैनगंगा नदीच्या तिरावर संगमबेट येथे पोलिसांनी रनिंग बेटवर धाड मारली. त्याच्याजवळून मोहाचा सडवा व इतर साहित्य असा दोन लाख ९८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक गणेश काळे, सोमेश्वर सेलोकर, जवाहरनगरचे ठाणेदार एस.के. बारसे, सहायक फौजदार शंडे, हवालदार नत्थू सार्वे, मिलिंद जनबंधू, एकनाथ जांभुळकर, वामन कुंभरे, विशाल मांढरे, कृणाल कढव यांनी केली. या कारवाईने दारु गाळणाºयांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: Police raid on running hammer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.