कुंटणखान्यावर पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:19 AM2017-08-31T00:19:19+5:302017-08-31T00:20:41+5:30

Police raid on the vandalism | कुंटणखान्यावर पोलिसांची धाड

कुंटणखान्यावर पोलिसांची धाड

Next
ठळक मुद्देगुन्हा दाखल : स्थानिक गुन्हे शाखा व लाखनी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लाखनी तालुक्यातील गराडा येथे देहव्यवसाय सुरु असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा व लाखनी पोलिसांच्या संयुक्त पथकाने काल मंगळवारी कारवाई केली. यात एका घरी धाड घालून महिलेविरुद्ध कारवाई करण्यात आली.
याबाबत असे की गराडा येथे देहव्यापार सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांना मिळाली. त्यांनी याची माहिती लाखनीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांना दिली. यावेळी दोन विभागाच्या वतीने सापळा रचून गराडा येथील सदर महिलेच्या घरी धाड घालण्यात आली.
यात देहविक्री करण्याच्या उद्देशाने एक महिला ही आढळली. सदर महिलेविरुद्ध लाखनी पोलीस ठाण्यात स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा सन १९५६ कलम ३,४,५ अन्वये कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर व साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश घुसर, लाखनीचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे, सहाय्यक निरीक्षक सोनटक्के, सहाय्यक फौजदार नेपाल टिचकुले, पोलीस नायक रोशन गजभिये, सत्यराव हेमने, पोलीस शिपाई वैभव चामट,कौशीक गजभिये, पौर्णिमा कान्हेकर यांनी केली.

Web Title: Police raid on the vandalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.