पोलीस भरती प्रक्रिया तरुणांवर अन्यायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:22 PM2018-02-11T23:22:31+5:302018-02-11T23:22:56+5:30

राज्याच्या गृहविभागाने पोलीस महाभरती प्रक्रिया राबविली आहे. महाभरतीच्या नावावर भंडारा जिल्ह्यात केवळ ३८ पदे भरण्यात येत आहे.

Police recruitment process is unfair to the youth | पोलीस भरती प्रक्रिया तरुणांवर अन्यायकारक

पोलीस भरती प्रक्रिया तरुणांवर अन्यायकारक

Next
ठळक मुद्देआज तरुणांचा मोर्चा : रद्द करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमत
भंडारा : राज्याच्या गृहविभागाने पोलीस महाभरती प्रक्रिया राबविली आहे. महाभरतीच्या नावावर भंडारा जिल्ह्यात केवळ ३८ पदे भरण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो तरुणांवर हा अन्याय असून ही पोलीस भरती प्रक्रिया रद्द करावे अशी मागणी तरुणांनी केली आहे. याबाबत आज सोमवारला जिल्ह्यातील शेकडो तरुण या अन्यायाविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत.
राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात चार हजार पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राबवित असल्याचे जाहीर केले. मात्र या भरती प्रक्रियेत अनेक तरुणांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र भंडारा जिल्ह्यात केवळ ३८ जागा पोलीस शिपाई प्रक्रियेतून भरण्यात येणार आहे. एकीकडे जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मोठी फौज रोजगारासाठी धावपळ करताना दिसून येत आहे. अशात देशसेवा करण्याची खुणगाठ बांधून भल्या पहाटे कसरत करणाºया युवकांचाही आकडा शेकडोंच्या घरात आहे.
त्यामुळे जिल्ह्यात या पोलीस भरती प्रक्रियेत शेकडोंना संधी मिळेल अशी अपेक्षा असताना गृहविभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पदभरतीच्या संख्यमुळे तरुण, तरुणींमध्ये नैराश्य पसरले आहे. हजारोंच्या संख्येने तरुण नोकरीच्या शोधात भटकत असताना शासनाकडून नोकरीबंदी करण्यात आली आहे. त्यातही पोलीस भरती प्रक्रियेत अनेकांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र तीही संधी गमावल्याची नामुष्की तरुणांवर ओढावली आहे. त्यामुळे राज्याच्या गृहविभागाच्या वतीने राबविण्यात येणारी पोलीस शिपाई पदभरती प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार पोलीस प्रशिक्षण घेणाºया युवकांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदन देणाºयांमध्ये विजय गजभिये, सूरज भुसारी, शेखर नेवारे, अजय तिघरे, अजय मेश्राम, दिगांबर निखाडे, सचिन खेडीकर, आनका खंडाईत, गणेश कावळे, मयूर घाटबांधे, केतन खेडीकर, चंदू शिवणकर, मेघराज इखार, कैलाश कठाणे, अविनाश मारबते, प्रणय खंडाईत, ज्ञानदीप शेंडे, अनिल मदनकर, अक्षय बारस्कर, दीनदयाल गिºहेपुंजे, प्रशांत सेलोकर, विशाल काटेखाये, निकेश कुंभलकर, गौरव टेकाम, सचिन करताळे, विष्णू डोकरे, अमृत कांबळे, शुभम वैरागडे आदींनी केली आहे.

Web Title: Police recruitment process is unfair to the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.