गोमांस विक्रेत्यावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 10:35 PM2018-06-23T22:35:35+5:302018-06-23T22:36:30+5:30

येथील भाईतलाव वॉर्डात गोमांस विक्रीचा व्यवसाय सुरु असल्याची गोपणीय माहिती मिळताच पवनी पोलिसांनी कत्तलखान्यावर छापा घातला असता आठ गोरे व तीन किलो गोमांस, गोहत्या करण्याकरिता लागणारे अवजारे जप्त करून आरोपीला अटक केली आहे.

Police reporter on beef seller | गोमांस विक्रेत्यावर पोलिसांचा छापा

गोमांस विक्रेत्यावर पोलिसांचा छापा

Next
ठळक मुद्देपवनी येथे कारवाई : आठ गोऱ्हे, तीन किलो गोमांससह आरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : येथील भाईतलाव वॉर्डात गोमांस विक्रीचा व्यवसाय सुरु असल्याची गोपणीय माहिती मिळताच पवनी पोलिसांनी कत्तलखान्यावर छापा घातला असता आठ गोरे व तीन किलो गोमांस, गोहत्या करण्याकरिता लागणारे अवजारे जप्त करून आरोपीला अटक केली आहे.
शुक्रवारच्या रात्री १० वाजताच्या दरम्यान भाईतलाव वॉर्डातील रहिवासी इरफान गुलामनबी कुरेशी (२८) हा इसम घराशेजारी गोहत्या करून गोमांस विक्रीचा व्यवसाय करीत होता. याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांना मिळताच त्यांनी उपनिरीक्षक धनश्री डाहाके व पोलीस कर्मचाऱ्यासह भाईतलाव वॉर्डातील कत्तलखान्यावर छापा घातला. या छाप्यात गोमांसाचे तुकडे, हाडे, वजन काटा, तीन कोयते, लाकडी कुंदा, आठ गोऱ्हे असा २५ हजार ३५० रूपयांच्या मुद्देमालासह आरोपीला अटक केली.
आरोपीजवळ गोमांस विक्री करताना तसेच कत्तलीकरिता जनावरे बाळगताना आढळून आल्यामुळे आरोपी इरफान कुरेशीविरुद्ध भादंवि ४२९, सहकलम ५, ५ (क), ७, ९ (अ), ९ (ब) महाराष्ट्र पशुसंवर्धन कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. छाप्यादरम्यान आढळेली आठ जनावरे येथील भंगाराम माता मंदिरांच्या स्वाधीन करण्यात आले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक धनश्री डाहाके, भरत ढाकणे, रमाकांत दीक्षित, मस्के, करपते यांनी केली. पवनी यथील कत्तलखान्यावर छापा घालून मोठ्या प्रमाणात गोवंश जातीचे जनावरे जप्त केल्याची ही अलिकडची मोठी कारवाई ठरली. या घटनेचा तपास पोलीस उपअधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे हे करीत आहेत.

Web Title: Police reporter on beef seller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.