कत्तलखान्यात जाणारे वाहन पोलिसांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:38 AM2021-05-20T04:38:37+5:302021-05-20T04:38:37+5:30

नितीन राजकुमार कुडमते (३०), अंकुश शिवचरण हटवार (२९) दोन्ही रा. अंबागड ता. तुमसर, असे आरोपितांचे नावे आहेत. गोबरवाही पोलीस ...

Police seized the vehicle going to the slaughterhouse | कत्तलखान्यात जाणारे वाहन पोलिसांनी पकडले

कत्तलखान्यात जाणारे वाहन पोलिसांनी पकडले

Next

नितीन राजकुमार कुडमते (३०), अंकुश शिवचरण हटवार (२९) दोन्ही रा. अंबागड ता. तुमसर, असे आरोपितांचे नावे आहेत.

गोबरवाही पोलीस ठाणे हदीतील राजापूर ते सुंदरटोलाचे दरम्यान डांबरी मेन रोडवर एक टाटा कंपनीची पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनात अवैधरीत्या पाच म्हैस भरून विनापरवाना कत्तल करण्याचे उद्देशाने घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. ठाणेदार दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार राजन गोडंगे, हवालदार भरत ढाकणे, रवी जायभाये, विष्णू जायभाये, प्रवीण खोत, नारायण कायंदे यांनी सापळा रचला. वाहनासह पाच म्हशी पकडले. प्रति म्हैस २० हजार रुपये प्रमाणे एकूण एक लाख रुपये व एक जुनी पिकअप वाहन तीन लाख रुपये, असा एकूण चार लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजन गोडंगे करीत आहेत.

Web Title: Police seized the vehicle going to the slaughterhouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.