अटकेच्या मागणीसाठी ग्रामस्थ धडकले पोलीस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:19 AM2018-03-20T00:19:22+5:302018-03-20T00:19:22+5:30

पिंपळगाव (को) येथील सुखदेव गेडाम याने पोलिसात तक्रार का दिली यावरून पुंडलिक परतके याच्यासह चार जणांना १६ मार्च रोजी जबर मारहाण करण्यात आली.

Police Station Officer | अटकेच्या मागणीसाठी ग्रामस्थ धडकले पोलीस ठाण्यात

अटकेच्या मागणीसाठी ग्रामस्थ धडकले पोलीस ठाण्यात

Next
ठळक मुद्देपिंपळगाव येथील घटना : क्षुल्लक कारणावरून मारहाण

आॅनलाईन लोकमत
लाखांदूर : पिंपळगाव (को) येथील सुखदेव गेडाम याने पोलिसात तक्रार का दिली यावरून पुंडलिक परतके याच्यासह चार जणांना १६ मार्च रोजी जबर मारहाण करण्यात आली. यातील चौघांवर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या तक्रारीनंतर लाखांदूर पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही. त्यामुळे शेकडो ग्रामस्थ पोलिस ठाण्यात पोहोचले. दोन दिवसात आरोपीला अटक करा अन्यथा आंदोलन करू असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
पिंपळगाव (कोहळी) येथील सुखदेव गेडाम यांनी पुंडलिक परतके याला शिवीगाळ करून केली. त्यानंतर भांडण झाले. याची तक्रार परतके यांनी लाखांदूर पोलिस ठाण्यात त्याच दिवशी दिली होती. तक्रारीवर लाखांदूर पोलिसांनी बयाणासाठी १६ मार्चला बोलविले होते. पुंडलिक परतके, नाजूक परतके, विकास परतके हे पोलिस ठाण्यातून पिंपळगावला जाताना गावाजवळील वळणावर सुखदेव गेडाम, रमेश गेडाम, घनश्याम गेडाम, नंदेश्वर गेडाम व दोन अनोळखी व्यक्तीने दुचाकी अडविली. आमची तक्रार पोलिसात का दिली. या कारणावरून मारहाण केल्याचा आरोप आहे. ही घटना उपसरपंच गोपाल परशुरामकर, पोलीस पाटिल परशुरामकर यांनी घटनास्थळी जावून मारेकऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र मारेकरी पसार झाले. जखमीमध्ये पुंडलिक परतके, नाजूक परतके, रविकांत परतके, विकास परतके, तुषार परतके हे ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत आहेत. याप्रकरणी आरोपीवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधीत कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल न केल्याने १७ मार्च रोजी गावातील शेकडो लोकांनी पोलीस ठाण्यात येऊन ठिय्या मांडला. यांचे नेतृत्व आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिसन सयाम, गोंदियाचे महिला आघाडी अध्यक्ष शीला उईके, टिकाराम मडावी, उपसरपंच गोपाळ परशुरामकर यांनी दोन दिवसात आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागाणी केली. आरोपीला लवकरच अटक करू असे आश्वासन दिल्यानंतर गावकºयांना रोष कमी झाला.

Web Title: Police Station Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.