Maharashtra Election 2019; भंडारा जिल्ह्यात राजकीय राडा; फुके-पटोलेंसह ७० जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 07:07 PM2019-10-19T19:07:39+5:302019-10-19T19:09:11+5:30

Maharashtra Election 2019; भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री घडलेल्या अपहरण व मारामारीच्या आरोपावरून येथील भाजपा उमेदवार डॉ.परिणय फुके व काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यासह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Political radio in Bhandara district; 4 persons charged with felonies | Maharashtra Election 2019; भंडारा जिल्ह्यात राजकीय राडा; फुके-पटोलेंसह ७० जणांवर गुन्हा दाखल

Maharashtra Election 2019; भंडारा जिल्ह्यात राजकीय राडा; फुके-पटोलेंसह ७० जणांवर गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्दे भंडाराचे अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांना विचारले असता सदर रक्कम आयकर विभागाच्या सुपूर्द केली असून ते चौकशी करीत असल्याचे म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री घडलेल्या अपहरण व मारामारीच्या आरोपावरून येथील भाजपा उमेदवार डॉ.परिणय फुके व काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यासह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

नेमके काय घडले साकोलीत?
साकोली पोलिसांत नितीन फुके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे चुलतभाऊ डॉ.परिणय फुके साकोली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या प्रचारासाठी सहा दिवसापासून ते साकोली येथे मुक्कामी आहेत. त्यांचा प्रचार करीत आहेत. शुक्रवारी दिवसभर त्यांनी डॉ.परिणय फुके यांचा साकोली येथे प्रचार केला. त्यानंतर रात्री १० वाजता ते भोजन करून मुक्कामाच्या ठिकाणी जात होते. त्यावेळी एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पीयो त्यांच्याजवळ येऊन थांबली. त्यात रिकी पटोलेसह दोन जण होते. त्यानंतर पाठोपाठ दुसरी गाडी आली. त्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले होते. रिंकी पटोले यांनी त्यांची गाडी बंद करून माझ्या पोटाला बंदूक लावून जबरदस्तीने गाडीत टाकले. त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. कपडे फाडण्यात आले. गाडीत पैशाची बॅग आहे, ती तुझी आहे असे कबूल कर नाहीतर जीवाने मारतो, असे रिंकी पटोले व नाना पटोले यांनी म्हटल्याचे या तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर नाना पटोले यांच्या कार्यालयात घेऊन गेले. याठिकाणी ३० ते ४० जणांनी मारहाण केली. दरम्यान तेथे पोलीस पोहचले, अन्यथा माझा जीव गेला असता असे नितीन फुके यांनी आपल्या तक्रारीतून म्हटले आहे. या मारहाणीत नितीन जखमी झाले.
यावरून साकोली पोलीस ठाण्यात काँग्रेस उमेदवार नाना पटोले, रिंकी पटोलेसह ३० ते ४० जणांविरुद्ध ३६३ (अपहरण), ५०६ (जीवे मारण्याची धमकी) यासह १४३, १४७, १४८, १४९ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची दुसरी बाजू अशी आहे
विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार पैशाचे पाकीट वाटत असल्याच्या संशयावरून झालेल्या वादात काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून पालकमंत्री तथा साकोलीचे भाजप उमेदवार डॉ.परिणय फुके यांच्यासह ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीर्थानंद विनोद पटोले यांनी साकोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपले काका नाना पटोले यांच्या प्रचारासाठी आले होते. शुक्रवारी रात्री ९ वाजता कोजागिरी कार्यक्रमाला जात असताना लाखांदूर फाट्यावर एक पांढºया रंगाची गाडी अंधारात उभी दिसली. काही लोक पाकीट वितरीत करीत होते. कशाचे पाकीट विचारले असता पैशाचे पाकीट वाटत असल्याचे तेथे उपस्थित लोकांनी सांगितले. त्यावरून आम्ही हा प्रकार थांबविण्याचा प्रकार केला. त्यावरून वाद घालून वाहनातील दोघांनी काठी व तलवारीने मारहाण केली. जितेंद्र पटोले यांच्या डोक्यावर प्रहार झाल्याने ते रक्तबंबाळ झाले. तेथील एका इसमाला पैशाच्या बॅगसह आमच्या स्कॉर्पीयोवर बसविले, त्याला नाव विचारले असता दीपक लोहिया रा.नरखेड असल्याचे सांगितल्याचे या तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर घटनेची माहिती नाना पटोले यांना देऊन आम्ही प्रचार कार्यालय गाठले. त्यानंतर साकोली पोलीस ठाणे गाठून पैशाचे पाकिट जमा केले असे या तक्रारीत नमुद आहे.
दरम्यान आम्ही पोलीस ठाण्याबाहेर बोलत असताना डॉ.परिणय फुके व ३० ते ४० लोक तेथे आले आणि त्यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. या मारहाणीत आपणाला जबर दुखापत झाल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी दीपक लोहिया, पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्यासह ३० जणांविरुद्ध १७१ (ब) (१) (ई), १४३, १४७, १४८, १४९, ३२५, ३२४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
 

Web Title: Political radio in Bhandara district; 4 persons charged with felonies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.