कारखान्याबाबत राजकारण तापले

By admin | Published: May 29, 2016 12:41 AM2016-05-29T00:41:44+5:302016-05-29T00:41:44+5:30

तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो कारखाना मागील १० वर्षांपासून बंद आहे. सध्या खरेदी-विक्रीची प्रक्रिया सुरु असल्याचे समजते.

The politics about the factories was heated | कारखान्याबाबत राजकारण तापले

कारखान्याबाबत राजकारण तापले

Next

भाजप-शिवसेना आमने-सामने : कारखाना खरेदी-विक्री चर्चा जोरात
तुमसर : तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो कारखाना मागील १० वर्षांपासून बंद आहे. सध्या खरेदी-विक्रीची प्रक्रिया सुरु असल्याचे समजते. शिवसेनेने कारखाना सुरु करण्यासंदर्भात पुढाकार घेवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला तर भाजपने शिवसेना श्रेययाचे राजकारण करीत असल्याचा आरोप लावला आहे. स्थानिक एका जि.प. सदस्याने सुध्दा शिवसेना पोळी शेकत असल्याचा आरोप केला आहे. येथे भाजप व सेनेत कलगीतुरा रंगणार असल्याचे दिसते.
तुमसर तालुक्यात माडगी येथे युनिव्हर्सल फेरो (मॅग्नीज) शुध्द करणारा कारखाना सुमारे ४५ वर्षापूर्वी मुंबईच्या उद्योगपतींनी सुरु केला होता. थकीत वीज बीलापोटी कारखान्याची वीज कापण्यात आली. सन २००६ पासुन हा कारखाना आजतायगत बंद आहे. येथे नियमित व रोजंदारी सुमारे ११०० कामगार कार्यरत होते. वैनगंगा काठावर सुमारे ३०४ एकरात हा कारखाना उभा आहे. दरम्यान, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.
कारखाना सुरु करण्याकरिता कामगार संघटनेने उपोषण, रास्ता रोको सारखे मार्ग अवलंबले. शेवटी प्रयत्न निष्फळ ठरले. काही कामगारांनी येथे स्वेच्छानिवृत्ती घेतली. काही कामगारांनी घेतली नाही. सध्या हे प्र्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान वीज वितरण कंपनीने सदर कारखान्याचे २०० कोटी रुपये वीज बिल माफ केल्याची माहिती आहे.
राज्य व केंद्रात सत्ताबदल झाले. मागील १० वर्षात दोन टर्म सरकारचे निघून गेले. पंरतु काहीच हालचाली झाल्या नाही. केंद्र सरकारला दोन वर्ष झाले तर राज्यातील सरकारला दीड वर्ष लोटले. २५ दिवसांपूर्वी खासदार नाना पटोले यांनी हा कारखाना पतंजली उद्योग समूह घेण्यास इच्छूक असल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्ह्यात राजकीय हालचालींना गती आली.
शिवसेनेने १ जून रोजी कारखाना सुरु करण्यासंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला आहे. अन्यथा मालकाने शेतकऱ्यांना त्यांच्या शेती परत करण्याची अट घातली आहे. तुमसर शहराला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्यामागे हा कारखानाच जबाबदार असल्याचे पत्रकात नमूद केले आहे. बेरोजगार व जनतेच्या हिताकरिता शिवसेना जिल्हा सेना प्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात आंदोलन करीत असल्याचेही नमूद केले आहे.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The politics about the factories was heated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.