मतदान केंद्रासाठी पोलिंग पार्ट्या रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 09:48 PM2017-10-15T21:48:03+5:302017-10-15T21:48:41+5:30

जिल्ह्यातील ३६२ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १६ आॅक्टोबर रोजी सकाळ पासून मतदानाला सुरूवात होणार असून ५ लाख २५ हजार ९९० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Polling parties depart for polling station | मतदान केंद्रासाठी पोलिंग पार्ट्या रवाना

मतदान केंद्रासाठी पोलिंग पार्ट्या रवाना

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : ९,२३८ उमेदवार रिंगणात, ५.२५ लाख नागरिक बजावणार मतदानाचा हक्क

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील ३६२ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १६ आॅक्टोबर रोजी सकाळ पासून मतदानाला सुरूवात होणार असून ५ लाख २५ हजार ९९० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पोलिंग पार्ट्या तालुका मुख्यालयातून रवाना झाल्या आहेत. दुसरीकडे निवडणुकीसाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावला आहे.
२ लाख ५८,०२६ महिला मतदार तर २ लाख ६७,९६४ पुरुष मतदारांचा समावेश आहे. प्रभागाची संख्या १,१५८ असून १,२३४ मतदान केंद्र आहे. मतदान केंद्रांतर्गत लक्ष ठेवण्यासाठी १३२ निवडणूक अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रविवारी तालुका मुख्यालयातून राज्य परिवहन महामंडळाच्या एकूण १३२ बसेस व ११३ चारचाकी वाहनांनधून पोलिंग पार्ट्या रवाना करण्यात आल्या.
प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक ईव्हीएम मशीन याप्रमाणे १२३४ ईव्हीएम मशीन ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय आपातकालीन स्थितीसाठी १० टक्के ईव्हीएम मशीन्स राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिसांनी मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान अनुचित घटना घडणार नाही, आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल यासाठी निवडणूक विभागातर्फे प्रशासन सज्ज आहे.
लाखनी तालुक्यात ५१ ग्रामपंचायतीसाठी १६५ बुथवर मतदान होणार आहे. मतदान केंद्राध्यक्षांसह ६६० कर्मचारी मतदान प्रक्रीयेत सहभागी आहेत. तसेच प्रत्येक बुथवर एक पोलिस कर्मचाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे.
लाखनी तालुक्यात १६ पथके संरक्षित असून झोनल अधिकाºयांची सात पथके आहेत. रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले.
प्रचाराला चढू लागला जोर
३६२ ग्रामपंचायतीमध्ये ३६२ सरपंचपदासह ३,०२४ सदस्यपदाची निवडणूक होत आहे. यासाठी एकूण ३,३८६ पदासाठी ९,२३८ उमेदवार रिंगणात आहेत. सरपंचपदासाठी १,५७६ तर सदस्यपदासाठी ७,६६२ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. यासाठी एकूण ६ हजार ६९८ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात १,३६६ मतदान अधिकारी व ४,०९८ कर्मचाºयांचा समावेश आहे.
१७ आॅक्टोबरलामतमोजणी तुमसर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोहाडीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत, भंडारा येथील पोलिस मुख्यालय परिसरातील बहुउद्देश्यीय सभागृहात, पवनी येथे नगर परिषद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, साकोली येथे शासकीय तंत्रनिकेतन, लाखनी येथे समर्थ महाविद्यालय तर लाखांदुर येथील शासकीय तंत्र विद्यालयात मतमोजणी होणार आहे. याचवेळी विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे निश्चित होईल.

Web Title: Polling parties depart for polling station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.