श्रीमंतांना सोडले गरीबांना झोडपले
By admin | Published: December 23, 2014 10:57 PM2014-12-23T22:57:31+5:302014-12-23T22:57:31+5:30
नगरपालिका हद्दीतील ‘अतिक्रमण’ हा पालिका प्रशासनाचा गळ्यातील काटा बनला आहे. एकीकडे प्रशासन अतिक्रमण निर्मूलनाचा फतवा जारी करून गरीबांचे अतिक्रमण काढत आहे
अतिक्रमण कारवाईत भेदभाव : धनदांडग्यावर कारवाई कोण करणार?
भंडारा : नगरपालिका हद्दीतील ‘अतिक्रमण’ हा पालिका प्रशासनाचा गळ्यातील काटा बनला आहे. एकीकडे प्रशासन अतिक्रमण निर्मूलनाचा फतवा जारी करून गरीबांचे अतिक्रमण काढत आहे तर दुसरीकडे श्रीमंतांच्या अतिक्रमणाला बगल देत आहे. कालपरवा अतिक्रमण निर्मूलनाच्या मोहीमेनंतर हाच प्रत्यय पुन्हा एकदा अनुभवास आला.
एक लाख लोकसंख्येच्या भंडारा शहरात दाट वस्ती आहे. मुख्यत: बसस्थानक ते जलाराम चौक पर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. यासह मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या उपरस्त्यावरही अतिक्रमण बोकाळले आहे. मात्र संबंध आणि राजकीय दबाव या दोन बाबी अतिक्रमण निर्मूलनाला अडसर ठरत आहे. स्थानिक प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव अतिक्रमणाला खतपाणी घालत आहे. (प्रतिनिधी)भंडारा : नगरपालिका हद्दीतील ‘अतिक्रमण’ हा पालिका प्रशासनाचा गळ्यातील काटा बनला आहे. एकीकडे प्रशासन अतिक्रमण निर्मूलनाचा फतवा जारी करून गरीबांचे अतिक्रमण काढत आहे तर दुसरीकडे श्रीमंतांच्या अतिक्रमणाला बगल देत आहे. कालपरवा अतिक्रमण निर्मूलनाच्या मोहीमेनंतर हाच प्रत्यय पुन्हा एकदा अनुभवास आला.
एक लाख लोकसंख्येच्या भंडारा शहरात दाट वस्ती आहे. मुख्यत: बसस्थानक ते जलाराम चौक पर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. यासह मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या उपरस्त्यावरही अतिक्रमण बोकाळले आहे. मात्र संबंध आणि राजकीय दबाव या दोन बाबी अतिक्रमण निर्मूलनाला अडसर ठरत आहे. स्थानिक प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव अतिक्रमणाला खतपाणी घालत आहे. (प्रतिनिधी)
श्रीमंतांचे अतिक्रमण केव्हा हटणार?
अतिक्रमण काढताना केवळ गरीबांचीच दुकाने काढली जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पालिका प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची मोहीम हातात घेतली. मात्र फुटपाथ दुकानदारांची व फेरीवाल्यांची दुकाने काढण्यात आली. परवा साईमंदिर मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले. मात्र त्याच मार्गावरील धनदांडग्यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात आले नाही. एकासोबत आईचा दुसऱ्यासोबत मावशीसारखा व्यवहार केल्याचा आरोप फुटपाथदुकानदारांनी केला आहे. फुटपाथ दुकानदारांचे आयुष्य उघड्यावर आले असताना त्यांच्यासाठी कुठेही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. पालिका प्रशासनाची ही मोहीम सर्वांसाठी आहे तर याच मार्गावरील अतिक्रमणधारकांची दुकाने का उद्ध्वस्त करण्यात आली.
तर सर्वांवरच कारवाई करा
धनदांडग्यांना सोडून गरीबांची दुकाने उदध्वस्त करणाऱ्या पालिका प्रशासनाने तर धनदांडग्यावरही कारवाई करावी. त्यांनी केलेले अतिक्रमण त्वरीत काढावे. अतिक्रमण काढणे ही चांगली बाब आहे. त्याचे स्वागतही आहे. रस्ता मोकळा होऊन रहदारीला त्याचा फायदा होतो. मात्र अतिक्रमण काढण्याचा जोर केवळ गरीबांवरच दाखविण्यात आला.