ग्रामीण भागात आजही शिक्षकांचे स्थान अनन्यसाधारण आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:24 AM2021-02-19T04:24:07+5:302021-02-19T04:24:07+5:30
भंडारा तालुक्यातील सातोना येथील मॉडर्न हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांची संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत ...
भंडारा तालुक्यातील सातोना येथील मॉडर्न हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांची संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत सहाय्यक शिक्षक सचिन तिरपुडे, पर्यवेक्षिका देशमुख, बावनकुळे, मडावी, नागपुरे,वडदे, काळे, जौंजाळ उपस्थित होते. यावेळी सचिन तिरपुडे यांनी नुकतेच रुजू झालेले उपशिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. उपशिक्षणाधिकारी गजभिये यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आपले स्पर्धा परीक्षेतील अनुभव कथन केले.
शिक्षक सचिन तिरपुडे यांनी विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती परीक्षा व यातूनच भविष्यात स्पर्धा परीक्षेतील अभ्यासक्रमाचा कसा मेळ घालता येईल यावर मार्गदर्शन केले. यावेळी इतर शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संचालन पर्यवेक्षिका देशमुख यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षक सचिन तिरपुडे यांनी मानले.