सकारात्मक विचाराने 'क्राईम' अत्यल्प
By admin | Published: November 23, 2015 12:43 AM2015-11-23T00:43:32+5:302015-11-23T00:43:32+5:30
जनतेशी सुसंवाद साधून वर्दीचा धाक न दाखवता मैत्रीपूर्ण व्यवहाराने नाती घट्ट तयार होतात. मनुष्य संस्काराने घडत असतो.
पोलीस पाटलांची सभा: १४ महिन्यात केवळ २४ गुन्ह्यांची नोंद
पालांदूर /चौ. : जनतेशी सुसंवाद साधून वर्दीचा धाक न दाखवता मैत्रीपूर्ण व्यवहाराने नाती घट्ट तयार होतात. मनुष्य संस्काराने घडत असतो. त्याला संस्कार समाजात मिळाल्यास वाईट मार्गाला जाणार नाही. यातूनच एकनिष्ठ, निर्लोभ, सुसंस्कारी समाजाची निर्मिती होऊन पोलीस विभागाचा ताण कमी होतो. सट्टा, मटका, दारु आदी गुन्ह्यांची मूळ असल्याने प्रत्येकांनी यातून मोकळे राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावे, असे आवाहन पालांदूर ठाण्याचे ठाणेदार एच. एम. सय्यद यांनी पोलीस पाटलांचा सभेला केले.
पालांदूर ठाण्याला ५४ गावांचा भार असून ३२ सहकाऱ्यांचा मदतीने सरंक्षण कार्य शांतपणे सुरु आहे. किटाळी, मुरमाडी, मांगली, तई गावातील दारु बंदी करुन गावांना शिस्तप्रिय वातावरण मिळण्यास मदत झाली. सट्टा, मटका राजरोसपणे चालवून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला गुन्हेगारीकडे नेणारी रित बंद करण्यात आली. महिन्याकाठी लाखाच्या घरात मिळणारी अवैध कमाईला झुगारुन पूर्णपणे सट्टा, मटका बंद करण्यात आला. ५४ गावातील प्रभावशाली व्यक्तींनी ठाणेदारांच्या कार्यशैलीवर समाधान व्यक्त केले असून कर्मावर भर देणाऱ्या व्यक्तींचा नेमीच जय होतो हे तंटामुक्त समिती, पोलीस पाटील,महिला सुरक्षा समिती यांच्याशी नियमित संवाद साधून गावातील समस्यांशी चर्चा व्हावी. आपसात असलेले हेवेदावे मोठ्यांच्या पुढाकाराने शांतपणाने सोडविल्यास गुन्ह्याचे प्रमाण कमी होते, राजकारण्यांनी पक्षभेद विसरुन नि:पक्षपणे समाजाला दिशा दिल्यास रामराज्य शक्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
जिवनात केवळ पैश्याला गरजेपेक्षा अधिक महत्व न देता कर्तव्याला श्रेष्ठत्व दिल्यास 'नर का नारायण' होण्यास वेळ लागत नाही. पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समिती, महिला सुरक्षा समिती यांच्याशी पोलीस विभागाने नियमित सलगी ठेवल्यास मोठे गुन्हे घडणारच नसल्याचे ते बोलले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या निराशेतून घडतांना दिसतात, कुटुंबात, समाजात निराशेत आढळणाऱ्या व्यक्तीकडे आपुलकीने सहानिशा करुन त्याच्या दु:खाचे वाटेकरी होत सुख प्रदान केल्यास आत्महत्येचे सत्र नक्कीच कमी होऊ शकते. समाजाला घडविण्याकरिता मोठ्या क्राईमना मुठमाती देण्याकरिता विद्यार्थी वर्गाला सजग करुन आशावादी समाजाची आशा निर्मिती होते. ठाणेदार सय्यद यांनी संताजी महाविद्यालय पालांदूर येथे अश्याच कार्यक्रमाची आखणी करुन कार्यक्षेत्रातील प्रत्येक शाळा-महाविद्यालय चर्चासत्राचे आयोजन यशस्वीपणे पार पाडले आहे. पोलीस विभागाच्या चर्चासत्राला परिसरातील पोलीस पाटील बहुसंख्येने हजर होते. कार्यक्रमाकरिता पोलीस हवालदार शेंडे, बाच्छल, नेमाडे आदीनी सहकार्य केले. (वार्ताहर)