वर्षभरानंतर पाॅझिटिव्ह शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 05:00 AM2021-07-02T05:00:00+5:302021-07-02T05:00:19+5:30

भंडारा जिल्ह्यात काेराेनाचा पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० राेजी भंडारा तालुक्यातील गराडा येथे आढळून आला हाेता. त्यानंतर काेराेना रुग्णांची संख्या वाढायला लागली. कधी एक आकडी तर कधी शून्य अशी रुग्ण संख्या ५ जुलै २०२०पर्यंत हाेती. त्यानंतर रुग्णसंख्येचा आलेख वाढत गेला. एप्रिल महिन्यात काेराेनाची दुसरी लाट आली आणि रुग्ण संख्या वाढायला लागली. एप्रिल महिन्यात तर दरराेज सरासरी १२०० रुग्ण आढळून येत हाेते. मृत्यूचेही तांडव सुरू हाेते. सर्व भयभीत झाले हाेते.

Positive zero after year | वर्षभरानंतर पाॅझिटिव्ह शून्य

वर्षभरानंतर पाॅझिटिव्ह शून्य

Next
ठळक मुद्देचार काेराेनामुक्त : जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९८.०४ टक्के

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तब्बल वर्षभरानंतर गुरुवारी जिल्ह्यात काेराेनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. ५२६ व्यक्तींची चाचणी केल्यानंतर सर्व नमुने निगेटिव्ह आले. ५ जुलै २०२० नंतर पहिल्यांदाच काेराेना रुग्णांची संख्या शून्य आली आहे. काेराेना ससंर्ग कमी हाेत असल्याने जिल्हा व आराेग्य प्रशासनाला माेठा दिलासा मिळाला आहे. काेराेना रुग्णांची संख्या शून्य आली असली तरी धाेका अद्याप संपलेला नाही. 
भंडारा जिल्ह्यात काेराेनाचा पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० राेजी भंडारा तालुक्यातील गराडा येथे आढळून आला हाेता. त्यानंतर काेराेना रुग्णांची संख्या वाढायला लागली. कधी एक आकडी तर कधी शून्य अशी रुग्ण संख्या ५ जुलै २०२०पर्यंत हाेती. त्यानंतर रुग्णसंख्येचा आलेख वाढत गेला. एप्रिल महिन्यात काेराेनाची दुसरी लाट आली आणि रुग्ण संख्या वाढायला लागली. एप्रिल महिन्यात तर दरराेज सरासरी १२०० रुग्ण आढळून येत हाेते. मृत्यूचेही तांडव सुरू हाेते. सर्व भयभीत झाले हाेते. रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाली हाेती. ऑक्सिजन मिळणेही कठीण झाले हाेते. अशा स्थितीत मे महिन्यापासून थाेडा दिलासा मिळायला लागला. जून महिन्यात तर काेराेना रुग्णांची संख्या अगदी कमी व्हायला लागली. १००च्या आत काेराेना रुग्ण येऊ लागले. जूनच्या शेवटच्या आठवड्यात ही संख्या १०च्या आत आली. आराेग्य विभागासह नागरिकांनीही सुटकेचा निश्वास साेडला. त्यात गुरुवारी काेराेना रुग्णांची संख्या शून्य आल्याने माेठा दिलासा मिळाला आहे.
गुरुवारी ५२६ जणांची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात काेणत्याही तालुक्यात रुग्ण आढळून आला नाही, तर चार रुग्ण बरे हाेऊन घरी गेले. जिल्ह्याचा रुग्ण बरे हाेण्याचा दर ९८.०४ टक्क्यांवर पाेहाेचला आहे. गत महिनाभरापासून मृत्यूची संख्याही कमी झाली आहे. गत काही दिवसात तर मृत्यूची नाेंद झाली नाही. मात्र आतापर्यंत ११२८ व्यक्तींचा काेराेनाने मृत्यू झाला. त्यात भंडारा ५१७, माेहाडी ९८, तुमसर १२९, पवनी ११२, लाखनी ९८, साकाेली १०५, लाखांदूर ६९ व्यक्तींचा समावेश आहे. 
काेराेना संसर्ग गत काही दिवसांपासून कमी हाेत असल्याने नागरिक काेराेना नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. बाजारातही माेठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.
 

जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३६
- रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण वाढत असल्याने काेराेना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी हाेत आहे. गुरुवारी जिल्ह्यात ३६ ॲक्टिव्ह रुग्ण हाेते. त्यात भंडारा ६, माेहाडी ३, तुमसर ५, पवनी तीन, लाखनी ६, साकाेली आठ, लाखांदूर पाच रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५९ हजार ४८२ व्यक्तिंना काेराेनाची लागण झाली हाेती. त्यापैकी ५८ हजार ३१८ व्यक्ती काेराेनामुक्त झाल्या असून, ११२८ व्यक्तिंचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर १.९० टक्के आहे.

गुरुवारी केलेल्या काेराेना चाचण्यांमध्ये जिल्ह्यात काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण संख्या शून्य आली. ही दिलासादायक बाब आहे. असे असले तरी धाेका मात्र अजूनही संपला नाही. काेराेनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा हाेत असताना नागरिकांनी अधिक सावध राहाणे आवश्यक आहे. नागरिकांनी काेराेना नियमांचे पालन करावे.
संदीप कदम
जिल्हाधिकारी, भंडारा

 

Web Title: Positive zero after year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.