वीजबिल वसुली स्थगित करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:34 AM2021-03-20T04:34:51+5:302021-03-20T04:34:51+5:30

मागील वर्षी कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे कित्येकांच्या हातचे काम गेले. लॉकडाऊन असल्याने महावितरण कंपनीने मीटर रीडिंग घेतले नाही. सुमारे ३ महिन्यांचे ...

Postpone recovery of electricity bill, demand of deprived Bahujan Aghadi | वीजबिल वसुली स्थगित करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी

वीजबिल वसुली स्थगित करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी

Next

मागील वर्षी कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे कित्येकांच्या हातचे काम गेले. लॉकडाऊन असल्याने महावितरण कंपनीने मीटर रीडिंग घेतले नाही. सुमारे ३ महिन्यांचे बिलही दिले नव्हते. मात्र, त्यानंतर त्या काळातील वीजबिल आकारून ग्राहकांना अवाढव्य बिल पाठविण्यात आले. एवढी रक्कम भरणे ग्राहकांना कठीण झाले. त्यात आता महावितरणकडून थकबाकीदार ग्राहकांकडून वीजबिल वसुली सुरू करण्यात आली आहे. बिल न भरणाऱ्यांची जोडणी कापण्याची कठोर कारवाई केली जात आहे. येत्या काळात परीक्षा असून, अशात वीजजोडणी कापल्यास विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होणार आहे. याकरिता वीजबिलाची समप्रमाणात विभागणी करून द्यावी तसेच वीजबिल वसुली स्थगित करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. यासाठी आघाडीकडून महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत गुरुवारी (दि. १८) ऊर्जामंत्र्याना निवेदन पाठविण्यात आले.

यावेळी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सतीश बंसोड, उपाध्यक्ष विनोद मेश्राम, महासचिव हेमंत बडोले, सचिव प्रकाश डोंगरे, राजू राहुलकर, सिध्दार्थ हुमणे, कोषाध्यक्ष एस. डी. महाजन, प्रसिद्धीप्रमुख एन. ए. मेश्राम, शहर अध्यक्ष विनोद मेश्राम यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Postpone recovery of electricity bill, demand of deprived Bahujan Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.