सरपंच-उपसरपंचांना मिळाला स्थगनादेश
By Admin | Published: February 4, 2015 11:09 PM2015-02-04T23:09:00+5:302015-02-04T23:09:00+5:30
ग्रामपंचायत खरबी नाका येथील सरपंच उपसरपंचासह तीन सदस्यांनी पदाचा दुरूपयोग करीत नागपूर उपायुक्तांनी सरपंच, उपसरपंचासह तीन सदस्यांचे पद खारीज केले.
जवाहरनगर / खरबी : ग्रामपंचायत खरबी नाका येथील सरपंच उपसरपंचासह तीन सदस्यांनी पदाचा दुरूपयोग करीत नागपूर उपायुक्तांनी सरपंच, उपसरपंचासह तीन सदस्यांचे पद खारीज केले. याला आवाहन देत त्यांनी स्थगनादेश प्राप्त केले.
ग्रामपंचायत खरबी नाका येथील ग्रामपंचायत सदस्य सुनिता आकरे, रंजना मेश्राम व रत्नमाला वाडीभस्मे यांनी नागपूर विभागीय उपायुक्त यांच्याकडे अर्ज दाखल केले. यात साईनाथ अॅग्रो इंडस्ट्रीजच्या नावाने नाहरकत प्रमाणपत्र हे बेकायदेशीरपणे देण्यात आले असल्याचा आरोप लावला होता. यासंबंधी अर्जदार व गैरअर्जदार यांचे युक्तीवादाचे अवलोकन केल्यानंतर ५ सप्टेंबर २०१४ अन्वये प्रकरण फेरचौकशी करीता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांचेकडे आले असता. गैरअर्जदार यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग केल्याचे निष्कर्षीत होत असल्याचा अहवाल उपायुक्तांना पाठविले. तद्नुसार अर्जदारानी लावले चार आरोपापैकी दोन आरोप सिद्ध होत असल्याचा ठपका ठेवीत गैरअर्जदार यांनी आपसी संगनमताने ही अनियमिता केली असल्याने गैरअर्जदारानी आपल्या पदाचा दुरूपयोग केला असल्याचे सिद्ध होते. या आशयाचे आदेश २२ जानेवारी २०१५ रोजी उपायुक्त पुनर्वसन नागपूर विभाग नागपूर एमएएच खान यांनी नमुद केले. याला आवाहन देत सरपंच विद्याताई मोथरकर, उपसरपंच मनोज गिरीपुंजे, ग्रामपंचायत सदस्य लता गोस्वामी, सुरेंद्र मोथरकर, वाल्मिक मोथरकर यांनी ग्रामविकास राज्य मंत्री यांच्या दालनात अपील दाखल करण्यात आली.
यात सरपंच विद्या मोथरकर, उपसरपंच मनोज गिरीपुंजे, सदस्य लता गोस्वामी, सुनेंद्र मोथरकर, वाल्मिक मोथरकर यांचा समावेश होता. सखोल चौकशी करीत सरपंच उपसरपंच व इतर तीन सदस्यांना ग्रामविकास राज्यमंत्री दालनाने स्थगनादेश दिली. (वार्ताहर)