बसस्थानकात खड्ड्यांची भरमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 10:10 PM2019-06-30T22:10:55+5:302019-06-30T22:11:12+5:30

जिल्ह्यातील मुख्य बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. खड्डेच खड्डे, पार्किंगची अव्यवस्था, सुरक्षेचा अभाव आहे. दुर्गंधी व कचऱ्यामुळे समस्येत अजून वाढ झाली आहे. आगार प्रशासन या समस्येकडे लक्ष देईल काय, असा प्रश्न प्रवासी विचारीत आहेत.

The potholes are full of bushes | बसस्थानकात खड्ड्यांची भरमार

बसस्थानकात खड्ड्यांची भरमार

Next
ठळक मुद्देरहदारीवर परिणाम : राज्य परिवहन आगाराचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील मुख्य बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. खड्डेच खड्डे, पार्किंगची अव्यवस्था, सुरक्षेचा अभाव आहे. दुर्गंधी व कचऱ्यामुळे समस्येत अजून वाढ झाली आहे. आगार प्रशासन या समस्येकडे लक्ष देईल काय, असा प्रश्न प्रवासी विचारीत आहेत.
जिल्ह्यातील सर्वात मोठे बसस्थानक म्हणून भंडारा बसस्थानकाची ओळख आहे. विशेष म्हणजे जिल्हयाचे मुख्यालय असल्याने अनौपचारिकपणे बसस्थानकाचे क्षेत्रफळ मोठे असणे स्वाभाविक आहे. बसस्थानकाची निर्मिती झाल्यानंतर जुन्या बसस्थानक परिसरात सुरक्षेची व स्वच्छतेची काळजी घेण्यात आली नाही. बसस्थानकाच्या उत्तर पूर्व दिशेला कांजीहाऊस आहे. पश्चिम दिशेला भंडारा तुमसर हा राज्य मार्ग आहे. दक्षिण दिशेला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल व जलतरण तलावाचा परिसर आहे.
पूर्व दिशेला झोपडपट्टीचा परिसर आहे. बसस्थानक परिसरात दुर्गंधी आहे. कचरा अस्तव्यस्त फेकलेला दिसून येतो. बसस्थानक आवारालगत व्यापारी संकुलाची भव्य इमारत आहे. त्यामुळे जुन्या बसस्थानकाचा भाग खुला असला तरी दाबल्या गेला आहे. शेळ्या, कुत्रे व अन्य बेवारस जनावरे येथे फिरत असतात. बसस्थानकाच्या आवरात खुलेआम लघुशंकेसाठी करण्यासाठी वापर करण्यात येतो. त्यामुळेही दुर्गंधीत वाढ झाली आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य प्रमाणात नालीचे बांधकाम नाही. उघड्यावरच लघूशंका केली जात असल्याने येथून जाणाºया प्रवाशांना तोंडावर रुमालच घेवून जावे लागते. विशेष म्हणजे बसस्थानक परिसरातील डांबरीकरण उखडले असल्याने या समस्येत अजून भर पडली आहे. गिट्टी उखडलेली असल्याने बसच्या चाकाखाली सापडून गिट्टी केव्हा प्रवाश्यांच्या अंगावर येईल याचा नेम नाही. मध्यंतरी आगार प्रशासनाने भरण घालून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला होता. पावसाळा सुरू झाला असून पाण्यामुळे बसस्थानकात चिखलच चिखल दिसून येतो.

Web Title: The potholes are full of bushes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.