वादळात पोल्ट्रीफॉर्म कोसळले
By admin | Published: June 1, 2016 01:51 AM2016-06-01T01:51:38+5:302016-06-01T01:51:38+5:30
तीन लक्ष रुपयांचे कर्ज घेवून एका बेरोजगाराने पोल्ट्री फॉर्मचा व्यवसाय थाटला. चार दिवसापूर्वी आलेल्या तुफान वादळाच्या तडाख्यात पोल्ट्री फॉर्मचे शेड जमीनदोस्त झाल्याने
व्यावसायिक संकटात : तलाठ्यांनी केली पाहणी
साकोली : तीन लक्ष रुपयांचे कर्ज घेवून एका बेरोजगाराने पोल्ट्री फॉर्मचा व्यवसाय थाटला. चार दिवसापूर्वी आलेल्या तुफान वादळाच्या तडाख्यात पोल्ट्री फॉर्मचे शेड जमीनदोस्त झाल्याने त्यात दबून १८६ कोंबड्यांचा मृत्यू झाला. यामुळे बेरोजगार अभिजीत खोेटेलेवर कर्जाचा डोंगर उभा ठाकला आहे.
साकोलीवरून बोदरा मार्गावर अभिजीत खोटेले या बेरोजगार युवकाने स्टेट बँकेच्या कृषी शाखेकडून ३ लाखाचे कर्ज घेतले. अभिजीतच्या पोल्ट्री फॉर्ममध्ये बॉयलर, पॅरेन्ट, लेअर व कॉकरेलचे जवळपास १८६ नग शुक्रवार दि. २७ मे रोजी आलेल्या चक्रीवादळ व गारपीटच्या तडाख्यात मृत्यूमुखी पडले. पोल्ट्री फॉर्मचे शेड चक्रीवादळात उडाल्याने फॉर्ममधील कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या.
ही घटना घडल्यावर साकोलीचे तलाठी मदनकर यांनी पोल्ट्री फॉर्मला भेट देवून पाहणी केली. पीडित अभिजीतच्या पोल्ट्री फॉर्मवर दोन मजूर कार्यरत असून ३ लाखांच्या कर्जावर अभिजीतला मासीक ८ हजार रु. चा भरणा कृषी बँकेला करणे होते. केवळ चार महिन्यात निसर्गाच्या प्रकोपामुळे हतबल झालेल्या अभिजीतसमोर आता पोल्ट्री फॉमचे कर्ज कसे चुकवावे ही गंभीर समस्या निर्मा झाली असून चक्रीवादळाच्या प्रकोपात याच दिवशी शहरासह परिसरातील अनेक फुटपाथ दुकानदारांना आर्थिक फटका बसला होता. आर्थिक मदत मिळावी अशी मागणी खोटेले यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)