सरपंचांमध्ये गावाचा चेहरा बदलविण्याची ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:28 AM2017-12-19T00:28:36+5:302017-12-19T00:29:03+5:30

सरपंचांना शासनाच्या मदतीने गावांमध्ये परिवर्तन घडविण्याची मोठी संधी आहे. मनात आणले तर लोक जीवनभर लक्षात ठेवतील.

The power to change the face of the village in the Sarpanch | सरपंचांमध्ये गावाचा चेहरा बदलविण्याची ताकद

सरपंचांमध्ये गावाचा चेहरा बदलविण्याची ताकद

Next
ठळक मुद्देबाळा काशिवार : लाखांदूर येथे ग्रा.पं.सदस्यांचा सत्कार

आॅनलाईन लोकमत
लाखांदूर : सरपंचांना शासनाच्या मदतीने गावांमध्ये परिवर्तन घडविण्याची मोठी संधी आहे. मनात आणले तर लोक जीवनभर लक्षात ठेवतील. विकासाची एकत्रित संकल्पना राबवा. तुम्ही खरे जनतेचे प्रतिनिधी, दुवा आहात. परिवर्तनाचे दूत म्हणून या सत्कार समारंभातून परत जा आणि शेतकरी व सामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी कटीबद्ध व्हा, परिवर्तन घडवा, असे आवाहन आमदार बाळा काशिवार यांनी केले.
लाखांदूर येथे भाजपच्यावतीने आयोजित नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ व भाजपा कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरेशी होते, सत्कारमूर्ती म्हणुन विधान परीषद सदस्य डॉ.परीणय फुके होते. विशेष अतिथी म्हणून जिल्हा महामंत्री मुकेश थानथराटे, प्रशांत खोब्रागडे, जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी, माधुरी हुकरे, दीपक मेंढे, राजेश बांते, वामनराव बेदरे, माजी सभापती गीता कापगते, रेखा भाजीपाले, इंद्रायणी कापगते, नगराध्यक्षा निलम हुमने, साकोलीच्या नगराध्यक्षा धनवंता राऊत, शेषराव वंजारी, हरीष तलमले, राजेंद्र फुलबांधे, गोपीचंद भेंडारकर, नलिनी खरकाटे, राजु नाकतोडे, ज्योती राऊत, नरेश खरकाटे, विनोद ठाकरे, उपस्थित होते.
यावेळी डॉ.परिणय फुके म्हणाले, समाजात सर्वच क्षेत्रांमध्ये चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. आपल्या कार्यातून जो समूहाचे जीवन बदलू शकतो, जीवन बदलण्यासाठी प्रेरित करून सकारात्मक दिशेने नेऊ शकतो तोच खºया अर्थाने नेता ठरतो. सरपंच गावाला उत्तम नेतृत्व देऊ शकले, तर विकासाच्या बदलाची प्रक्रिया वेगाने सुरू होईल. तसे झाले तर आपण पाच वर्षात समृद्ध होणार.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लाखांदूर तालुक्यातील २१७ कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ५०२ सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष नुतन कांबळे यांनी केले. संचालन प्रविन राऊत यांनी तर आभारप्रदर्शन तुकाराम भेंडारकर यांनी केले. कार्यक्रमासाठी राजेश महावाडे, ओम करंजेकर, रमेश दोनोडे, हरीष बगमारे, भारत मेहंदळे, राहुल कोटरंगे, विजय खरकाटे, भुषण चिञिव, यश खत्री, रजत गौरकर, योगेश ब्राह्मणकर, गिरीष भागडकर, तुलसीदास बुरडे, राहुल राऊत, रूपेश काळबांधे, लोमेश देशमुख, आनंद देशपांडे यांच्यासह तालुका आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Web Title: The power to change the face of the village in the Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.