उन्हाळी धानाला हवेय सिंचनाचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 09:32 PM2019-03-16T21:32:33+5:302019-03-16T21:33:15+5:30

उष्णतेची दाहकता वाढत असताना पाण्याचे पातळीत घट होण्यास सुरूवात झाली आहे. कृषीपंप धारकांना वीज पुरवठा करताना वेळेत वाढ करण्यात आली नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आचार संहितेतही सिहोरा स्थित असणाºया वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला घेराव करण्याचा निर्णय घेतला आहे.

The power of irrigation that is needed in the summer season | उन्हाळी धानाला हवेय सिंचनाचे बळ

उन्हाळी धानाला हवेय सिंचनाचे बळ

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये संताप : गावात बैठकांचे सत्र सुरू, सिंचन सुविधा अपूर्ण, जलस्रोतही आटले, नियमित वीज पुरवठ्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : उष्णतेची दाहकता वाढत असताना पाण्याचे पातळीत घट होण्यास सुरूवात झाली आहे. कृषीपंप धारकांना वीज पुरवठा करताना वेळेत वाढ करण्यात आली नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आचार संहितेतही सिहोरा स्थित असणाºया वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला घेराव करण्याचा निर्णय घेतला आहे.
सिहोरा परिसरातील गावे वैनगंगा, बावनथडी नद्याचे खोऱ्यात आहेत. याच परिसरात चांदपूर जलाशय आहे. परंतु नियोजन शुन्यतेमुळे बारमाही सिंचनाची सोय या परिसरात नाही. कवलेवाडा धरणात वैनगंगा नदी पात्रात अडविण्यात आलेल्या पाण्याचा उपयोग गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्प आणि शेतकऱ्यांना होत आहे. या पाण्यावर सिहोरा परिसरातील ३४ हजार शेतकरी आणि त्यांचे कुटुंबियांचा तितकाच अधिकार असताना त्यांना मात्र भोपळा दिला जात आहे.
या परिसरात असणाºया १४ हजार हेक्टर आर शेती बारमाही सिंचनाखाली आणण्याची क्षमता पाण्याचे स्त्रोतात आहे. परंतु शेतकºयांना सुजलाम सुफलाम करण्याची मानसिकता यंत्रणेची नाही. कवलेवाडा धरणातून पाण्याचा उपसा करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात बेधडक नवे प्रकल्प उभारले जात आहे. तुमसर आणि तिरोडा शहराला नळ योजना याच धरणात उभ्या केल्या जात आहेत. परंतु याच धर्तीवर चांदपूर जलाशयात पाण्याचा उपसा करण्यासाठी नळ योजना अथवा प्रकल्प मंजुर केल्या जात नाही. दरम्यान सिंचनाची सोय नसताना उन्हाळी धान पिकांचे लागवड करिता शेतकरी धावपड करित आहे.
मार्च महिन्याचे प्रथम आठवड्यापर्यंत रोवणी आटोपली आहे. उन्हाळी धान पिकांना पाण्याची अधिक गरज असल्याने विज पुरवठा १६ तास करण्याची ओरड शेतकरी करीत आहे. नद्याचे खोरे असल्याने पाण्याची ओरड शेतकरी करीत आहे. नद्याचे खोरे असल्याने पाण्याची मुबलक साठा आहे. परंतु आठ तास वीज पुरवठा असताना पाण्याचा उपसा करताना अडचणीचे ठरत आहे. यामुळे तासाभरात शेतीत असणारे पाणी आटत आहे.
महावितरण कंपनी मार्फत शेतकऱ्यांना तीन महिने वीज पुरवठ्याचे वेळेत वाढ करण्यासाठी सिहोरा स्थित असणाºया वीज वितरण कंपनीचे कार्यालयाला घेराव करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीची आचार संहिता असताना त्यांची भिती संतापाचे उदे्रकांत नाही. गावा गावात शेतकरी बैठकीचे आयोजन करित आहेत. परंतु शासन, प्रशासन बेखबर आहे. पंचायत समितीचे माजी सभापती कलाम शेख यांचे नेतृत्वात अशा बैठकीचे आयोजन करण्यता येत आहे.
आचार संहितेतही घेराव आंदोलनात टोकांची भूमिका घेतली जाणार आहे. ९० दिवस धान पिकाचे संवर्धन करिता महत्त्वाचे असताना महावितरणच्या कार्यालयाला घेराव करण्याचे निश्चित झाले आहे. घेराव आंदोलन कोणत्याही लोकप्रतिनिधी याचे विरोधात नसून गैर राजकीय ठेवण्यात आले आहे. वेळ निघून गेल्यावर धान पिकांना वाचविता येणार नाही. यामुळे आठ दिवसात निर्णय घेतले पाहिजे, असा सूर आहे.
धान पिकांवर खोडकिड्यांचा प्रकोप
उन्हाळी धान पिकाची लागवड करताच खोडकिड्यांने डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. यामुळे औषधीची फवारणी सुरूवाती पासून करण्यात येत असल्याने उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. महागडी औषध आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतला असताना खोडकिडा आटोक्यात येत नसल्याची माहिती शेतकºयांनी दिली.

Web Title: The power of irrigation that is needed in the summer season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.