संगम येथील विजेचा तिढा सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:38 AM2021-05-20T04:38:19+5:302021-05-20T04:38:19+5:30
संगम पुनर्वसन या प्रकल्प बाधित गावातील धोकादायक विद्युत यंत्रणा तसेच जागोजागी वाकलेले विद्युत खांब, लोंबकळलेल्या ...
संगम पुनर्वसन या प्रकल्प बाधित गावातील धोकादायक विद्युत यंत्रणा तसेच जागोजागी वाकलेले विद्युत खांब, लोंबकळलेल्या तारा, खराब झालेले ट्रान्सफार्मर, फुटलेले खुले रोहित्र इत्यादीमुळे गावातील वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत होता. त्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागत होते. याबाबत विद्युत विभागाचे कर्मचारी प्रतिसाद देत नसल्याची गावाकऱ्यांची ओरड होती. रोजच्या खंडित होणाऱ्या विजेपासून गावकरी त्रस्त झाले होते. १० मे रोजी लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. १८ मे रोजी शहापूर सर्कलचे कनिष्ठ अभियंता चापेकर यांनी वृत्ताची दखल घेतली. संगम येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी जनमित्र अजय फालके तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या टीमसह स्वतः दोन तास उपस्थित राहून आपल्या देखरेखीखाली नवीन ट्रान्सफार्मर लावले. त्यामुळे संगम येथील वारंवार खंडित होणाऱ्या विजेचा तिढा सुटला. गावकऱ्यांनी लोकमत समूह व कनिष्ठ अभियंता चापेकर, जनमित्र अजय फालके तसेच त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त केले.
कोट
संगम येथील अनेक वीज ग्राहकांकडे विजेचे मोठ्या प्रमाणात थकीत बिल असून वीज बिल सूट झाल्याबाबत आम्हाला कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी न पडता वीज ग्राहकांनी जमत नसल्यास हप्त्याने विजेचे बिल भरून विद्युत विभागाला सहकार्य करावे.
-चापेकर
कनिष्ठ अभियंता वीज वितरण कंपनी. शहापूर सर्कल.