बीटीबीने साधली सौरऊर्जेतून वीज क्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:09 PM2017-11-06T23:09:48+5:302017-11-06T23:10:03+5:30
भारनियमनाची अगतिकता ओळखत नैसर्गिक सौर उर्जेचा वापर आता गरजेचे झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा / पालांदूर : भारनियमनाची अगतिकता ओळखत नैसर्गिक सौर उर्जेचा वापर आता गरजेचे झाले आहे. भंडारा येथील बीटीबीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांनी त्यांच्या भाजीबाजारात सौर ऊर्जेचा वापर केला आहे. नुसताच सौर ऊर्जेचा वापर केला नाही तर, त्यातून निर्मित विजेतून भाजीबाजारात वापर करून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी जोपासली आहे. या माध्यमातून बारापात्रे यांनी जिल्ह्याला व शेतकºयांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
स्वार्थासाठी प्रत्येक व्यक्ती निसर्गाला आपल्या सोयीने वापरतो. पर्यावरणाचा ºहास घडत निसर्गानेही आपली नियमितता सोडत अनियमितता दाखविली आहे. विजेचा वापर बघता वीज उत्पादन अल्प होत आहे. कोळसा, पाण्याची मुबलकता कमी झाली असून भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात हजारो शेतकरी वर्षभरापासून कृषी वीज जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत. विजेची जोडणी न झाल्याने पाणी असूनही शेती कोरडवाहूच आहे. शासनही मागेल त्याला वीज देण्यात कमी पडत आहे. विजेचे उत्पादनही कमी होत आहे. मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशावेळी हातावर हात मांडून बसण्यापेक्षा नवा पर्याय शोधत सौर ऊर्जेचा वापर करावा. शासनही या विचाराचा प्रचार व प्रसार करीत आहे. शासनाच्या खांद्याला खांदा लावत सौरऊर्जेतून विजेची गरज भागवावी. यातून निसर्गाशी सलगी राखण्यासाठी मदत होत भारनियमनाचा बडगा सुद्धा शांत होण्यास मदत मिळणार आहे. बीटीबी भाजीबाजारात कार्यान्वित झालेल्या सौरऊर्जेच्या संचातून संपूर्ण मंडीतील विजेची गरज पूर्ण झाली असून यामुळे बारापात्रे यांनी वीज बिलाचा खर्च टाळला आहे. यामुळे एक आदर्श समाजासमोर उभा आहे.
शेतकºयांनी आपल्या शेतात, घरात सौर ऊर्जेचा वापर करीत नैसर्गिक साधन संपत्तीचा उपभोग घेत निसर्गाचा समतोल राखण्याकरिता मदत करावी. सौर ऊर्जेमुळे शेताला दिवसाच सिंचन शक्य असल्याने व शासनही अनुदान देत असल्याने कुठलीही अडचण नाही.
-बंडू बारापात्रे, अध्यक्ष,
बीटीबी असोसिएशन भंडारा.