विजेचा खेळखंडोबा मागणीपेक्षा पुरवठा कमी

By admin | Published: August 26, 2016 12:32 AM2016-08-26T00:32:07+5:302016-08-26T00:32:07+5:30

परिसरामध्ये गडेगाव फिडर अंतर्गत विद्युत पुरवठा केला जात असून या फिडरवर मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने

Power supply reduction is less than demand | विजेचा खेळखंडोबा मागणीपेक्षा पुरवठा कमी

विजेचा खेळखंडोबा मागणीपेक्षा पुरवठा कमी

Next

पावसाअभावी शेतकरी संकटात : गडेगाव फिडर मधील प्रकार
आमगाव (दिघोरी) : परिसरामध्ये गडेगाव फिडर अंतर्गत विद्युत पुरवठा केला जात असून या फिडरवर मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने परिसरामध्ये विजेचा खेळखंडोबा सुरु आहे. यामुळे ग्रामीणांमध्ये विद्युत विभागाविषयी तीव्र संतापाची लाट असून त्याचा उद्रेक होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
मागील अनेक वर्षापासून दुसरे फिडर बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव विद्युत विभागाने वरिष्ठ यंत्रणेकडे पाठविला आहे. मात्र आजतागायत याविषयी कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही. या फिडरवर क्षमतेपेक्षा जास्त दाब येत असल्याने अर्ध्या अर्ध्या तासाध्ये विद्युत पुरवठा खंडीत होत आहे.
वातावरणामध्ये उष्णता असल्याने घरोघरी पंख्याचा वापर वाढला आहे. तसेच पावसाने दडी मारल्याने शेतीला पाणी देण्यासाठी कृषीपंप सुरु ठेवावे लागत आहे. मात्र विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने शेतीला पाणी कसे द्यावे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. रात्री अपरात्री विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने गावामध्ये अंधाराचे काळोख पसरले असते. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका निर्माण झाला आहे. (वार्ताहर)

Web Title: Power supply reduction is less than demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.