भागवत प्रवचनात जगाच्या कल्याणाची शक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 10:03 PM2018-12-29T22:03:54+5:302018-12-29T22:04:14+5:30

भागवत प्रवचन ज्ञानयज्ञ सोहळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साजरे केले जात आहेत. भागवतात जगाचे कल्याणाची शक्ती आहे. भारतीय संस्कृती प्राचीन असून अशी संस्कृती जगाच्या पाठीवर कुठेही नाही. भागवत प्रवचन ऐकताना देहभान हरपून जाते हीच भागवताची खरी शक्ती आहे. असे प्रतिपादन मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांनी केले.

The power of the welfare of the world in Bhagwat Sermon | भागवत प्रवचनात जगाच्या कल्याणाची शक्ती

भागवत प्रवचनात जगाच्या कल्याणाची शक्ती

Next
ठळक मुद्देवर्षा पटेल : सीतेपार येथे भागवत प्रवचन, मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : भागवत प्रवचन ज्ञानयज्ञ सोहळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साजरे केले जात आहेत. भागवतात जगाचे कल्याणाची शक्ती आहे. भारतीय संस्कृती प्राचीन असून अशी संस्कृती जगाच्या पाठीवर कुठेही नाही. भागवत प्रवचन ऐकताना देहभान हरपून जाते हीच भागवताची खरी शक्ती आहे. असे प्रतिपादन मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांनी केले.
सितेपार येथे आठ दिवसीय भागवत प्रवचन ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आले होते. हभप टेकाम महाराज यांनी आपल्या वाणीने भागवताचे अनेक पैलू मांडून शेकडो भाविकांना मंत्रमुग्ध केले. गं्रंथपूजा माजी जि.प. सदस्य विठ्ठलराव रहमतकर यांचे हस्ते करण्यात आली. यावेळी भंडारा जि.प. च्या महिला व बालकल्याण सभापती रेखा ठाकरे, पोलीस पाटील भुपतराव सार्वे, सरपंच गजानन लांजेवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भागवत सप्ताहात ग्रामस्थांकरिता सरपंच गजानन लांजेवार यांच्या तर्फे मोफत आरोग्य तपासणी, औषध वितरीत करण्यात आले. १२० गरजूंना चष्मे विनामुल्य वितरीत करण्यात आले. दहीहंडी व गोपालकाला कार्यक्रमानंतर खा.मधुकर कुकडे यांच्या विकासनिधीतून १० लाखांचे रस्त्याचे भूमिपूजन वर्षाताई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खा.मधुकर कुकडे, माजी आ.अनिल बावनकर, राजू कारेमोरे, सुरेश रहांगडाले, देवचंद ठाकरे, सभापती रेखा ठाकरे, जि.प. सदस्य प्रेरणा तुरकर, प्रतीक्षा कटरे, शुभांगी रहांगडाले, सभापती धनेंद्र तुरकर, अरविंद राऊत, राजू ढबाले, डॉ.पंकज कारेमोरे, विठ्ठलराव कहालकर, उमेश कटरे, मदन भगत सह मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
आ.चरण वाघमारे यांनी भागवत प्रवचनाला भेट दिली. खनिज विकास निधीतून १५ लाख निधी विकास कामाकरिता देण्याची घोषणा केली. भागवत प्रवचन एक जीवन शैली असून ग्रामीण भागात संस्कृती आजही टिकून असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवचनापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन आ.चरण वाघमारे यांनी केले.भागवत प्रवचनाकरिता सितेपारचे सरपंच गजानन लांजेवार, पोलीस पाटील भूपतराव सार्वेसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Web Title: The power of the welfare of the world in Bhagwat Sermon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.