विद्युतअभावी धानपीक धोक्यात

By admin | Published: September 15, 2015 12:40 AM2015-09-15T00:40:58+5:302015-09-15T00:40:58+5:30

आधीच निसर्गाची अवकृपा व त्यात वीज वितरण कंपनीचे संकट यामुळे तालुक्यातील शेतकरी तुर्तास तरी संकटात सापडला आहे.

PowerPoint PaddyPack Danger | विद्युतअभावी धानपीक धोक्यात

विद्युतअभावी धानपीक धोक्यात

Next

मंत्र्यांच्या आदेशाचे पालन नाही : समस्यासंदर्भात वीज वितरण कंपनीचे दुर्लक्षच
साकोली : आधीच निसर्गाची अवकृपा व त्यात वीज वितरण कंपनीचे संकट यामुळे तालुक्यातील शेतकरी तुर्तास तरी संकटात सापडला आहे.
मागील पंधरा दिवसापासून जांभळी सडक शेतशिवारातील केबल खराब झाल्याने विद्युत पुरवठा बंद आहे. त्यामुळे शेतीला पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे धानपीक करपत आहे. याची तक्रार कंपनीला देण्यात आली असली तरी उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येत आहेत. ‘उर्जामंत्री आले अन गेले’ मात्र विजेच्या समस्या कायमच आहेत. त्यामुळे उर्जा मंत्र्यांची आढावा बैठक कशासाठी असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.
जांभळी सडक येथील नगिना राईस मिल जवळील मधुकर ठवरे यांचे शेतात असलेल्या ट्रॉन्सफार्मर पासून वायर खराब झाल्यामुळे शेतकरी शेतीला पाणीपुरवठा करु शकत नाही. त्यामुळे पीक नष्ट होत आहेत. त्यामुळे नवीन वायर तात्काळ लावून विद्युत पुरवठा सुरु करावा अशी तक्रार जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते यांनी वीज कंपनीचे कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे. काही दिवसांपासून पाऊस बेपत्ता आहे. शेतीसाठी समाधानकारक पाणी अजूनही मिळालेले नाही.
या अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील तलाव, नदी, नाले, बोळ्या पूर्णपणे भरले नाही. त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत जलसाठा पुरणार नाही अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.
या अडचणीतूनही शेतकऱ्यांनी कसेबसे पीक वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र आता पुन्हा करपा व खोडकिडा या रोगाने परिसरात हैदोस घातला.
त्यामुळे शेतकरी पुरता खचला असून यावर्षीही उत्पन्न मिळेल याची हमखास हमी नाही. त्यामुळे शासनाने भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून एकरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वाडीभस्मे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना इतर सोयीसुविधा मिळाव्या यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. त्याची अंमलबजावणी होत असताना वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन का? जांभळी येथील ही समस्या तत्काळ मार्गी लागली नाही तर काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करू.
- होमराज कापगते,
जिल्हा परिषद सदस्य, कुंभली

Web Title: PowerPoint PaddyPack Danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.