लाखनीत प्रफुल्ल पटेलांची कार्यकर्त्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:34 AM2021-03-05T04:34:59+5:302021-03-05T04:34:59+5:30
आपल्या पक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवावीत तसेच येणाऱ्या काळात नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत जास्तीत-जास्त संख्येने आपले उमेदवार ...
आपल्या पक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवावीत तसेच येणाऱ्या काळात नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत जास्तीत-जास्त संख्येने आपले उमेदवार निवडून येण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाच्या पदाधिकारी यांच्याकडून लाखणी शहरातील व तालुक्यातील समस्या जाणून घेऊन कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी व प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची काटेकोर पालन करावे, अशी सूचना केली.
यावेळी नाना पंचबुद्धे, माजी आ. राजेंद्र जैन, आ. राजू कारेमोरे, मधुकर कुकडे, धनंजय दलाल, तालुका अध्यक्ष डॉ. विकास गभने, शहराध्यक्ष धनू व्यास, दामाजी खंडाईत, विनायक बुरडे, नरेश इलमकर, मनोज टहिल्यानी, अशोक चोले, नागेश पाटील वाघाये, नरेश इलमकर, सुधनवा चेटुले, प्रवीण बोरकर, जितेंद्र बोंद्रे, रोहित साखरे, अर्चना ढेंगे, मायाताई अंबुले, सुनीता खेडीकर, नीशाताई चोले, सुनील बर्वे, वनिता गभने, प्रणव शामकुवर, सुरेंद्र निर्वाण, अशोक हजारे, चंदा लांडगे, सुनंदा निर्वाण, नितीन निर्वाण, विनोद आगलावे, मनोज पोहरकर, चेतन निर्वाण, सचिन भैसारे, शुभम बडोले, नीलेश गाढवे, शशिकांत भोयर, प्रशांत मेश्राम, राहुल तवाडे, कृष्णा रोकडे, मूलचंद मेश्राम यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते तसेच लाखनी तालुका व शहरातील ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी पूज्य सिंधी समाजाचे अध्यक्ष अनिल टहिल्यानी यांच्यासह समाजाचे प्रमुख नेते उपस्थित होते. सिंधी समाजाच्या व लाखनी व्यापारी असोसिएशनच्यावतीने खा. पटेलांचे स्वागत करण्यात आले. यावेळी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लाखनी तालुक्यातील भाजपचे नेते व माजी सरपंच बबलू निंबेकर यांच्यासोबत लाखनी महिला शहर काँग्रेसच्या अध्यक्ष रजनी मुळे, लाखनी नगर पंचायतीच्या माजी उपाध्यक्ष माया निंबेकर, शमीम शेख, निशिगंधा बावणे, रेवंताबाई बावणे, कल्पना पंधरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.