प्रफुल पटेल यांची पालिका पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:31 AM2021-03-14T04:31:28+5:302021-03-14T04:31:28+5:30

भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक भंडारा येथे राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांच्या मुख्य उपस्थितीत ...

Praful Patel's discussion with municipal office bearers and activists | प्रफुल पटेल यांची पालिका पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा

प्रफुल पटेल यांची पालिका पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा

Next

भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक भंडारा येथे राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांच्या मुख्य उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगर परिषदेमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी खासदार पटेल यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

याप्रसंगी खा. पटेल म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेला अनुसरून नागरिकांपर्यंत ते पोहोचवण्याची जबाबदारी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उचलली पाहिजे. महाविकास आघाडी शासन जनहितार्थ अनेक योजना राबवत आहे. याबाबत प्रत्येकाच्या घरी जाऊन माहिती दिली पाहिजे. तसेच एकजुटीने कार्य करून नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यावर भर द्यावा, असे आवाहनही खासदार पटेल यांनी केले. तसेच पक्ष पदाधिकाऱ्यांना पक्षसंघटन मजबूत करण्यासंदर्भात विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रही दिले. या बैठकीला आमदार राजू कारेमोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खासदार मधुकर कुकडे, धनंजय दलाल, महेंद्र गडकरी, विनयमोहन पशिने, बाबू बागडे, परवेज पटेल, डॉ. रवींद्र वानखेडे, डॉ. जगदीश निंबार्ते, यशवंत सोनकुसरे, नेहा शेंडे, शुभांगी खोब्रागडे, हेमंत महाकाळकर, अश्विन बांगडकर, राहुल निर्वाण, हिमांशू मेंढे, आशीष दलाल, सोनू खोब्रागडे, मंजूषा बुरडे, अमन मेश्राम यासहित अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

Web Title: Praful Patel's discussion with municipal office bearers and activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.