प्रगती बानेवार हॉकी संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 10:28 PM2017-11-29T22:28:47+5:302017-11-29T22:29:07+5:30

हॉकी हा भारताचा राष्टÑीय खेळ असून पुरुषी खेळ मानला जातो. परंतु तुमसर तालुक्यातील एका महिला खेळाडूची हॉकी इंडिया सिनिअर चॅम्पीयनशीसाठी निवड झाली.

Pragati Baneyar Hockey team | प्रगती बानेवार हॉकी संघात

प्रगती बानेवार हॉकी संघात

Next

आॅनलाईन लोकमत
तुमसर : हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असून पुरुषी खेळ मानला जातो. परंतु तुमसर तालुक्यातील एका महिला खेळाडूची हॉकी इंडिया सिनिअर चॅम्पीयनशीसाठी निवड झाली. या स्पर्धेत तीने चमकदार कामगिरी बजावली आहे. अशा प्रतिभावान व गुणी खेळाडूंचे नाव प्रगती पंढरी बानेवार असे आहे. प्रसिध्द हॉकी मार्गदर्शक लाकरा यांच्या मार्गदर्शनात ती सराव करीत आहे.
तुमसर तालुक्यातील बपेरा येथील मुळची राहणारी प्रगती बानेवार असून हॉकी इंडिया सिनिअर गटात ती सध्या खेळत आहे. प्रगतीचे वडील जि.प. प्राथमिक शाळा ब्राम्हणटोला येथे शिक्षक असून आई गृहिणी आहे. लहाणपणापासून प्रगतीला खेळाची आवड होती. प्रथम धावण्याचा सराव तीने केला. मैदानी स्पर्धा तिने गाजविल्या. पट्टीची धावपटू आहे.
तुमसर येथील प्रसिध्द क्रीडा मार्गदर्शक अर्चना शर्मा यांनी प्रगतीला मार्गदर्शन केले. खेळाडू घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सन २०११-२०१२ मध्ये शिव छत्रपती क्रीडा प्रबोधिनी, पुणे येथे प्रथम प्रगतीची निवड झाली.

Web Title: Pragati Baneyar Hockey team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.