अधिकाऱ्यांच्या कारवाईसाठी आंदोलनाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 01:38 AM2019-06-22T01:38:54+5:302019-06-22T01:40:04+5:30
सिरसोली येथील शिवलाल लिल्हारेचे घर पाडले गेले. आश्वासन पत्र मागे घेतले गेले. अकरा जणांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले. शिवलाल लिल्हारे यांना न्याय मिळावा व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आदी विषया संबंधाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : सिरसोली येथील शिवलाल लिल्हारेचे घर पाडले गेले. आश्वासन पत्र मागे घेतले गेले. अकरा जणांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले. शिवलाल लिल्हारे यांना न्याय मिळावा व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आदी विषया संबंधाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात आंदोलनाची पुर्वसुचनाही देण्यात आली आहे.
सिरसोलीच्या शिवलाल लिल्हारे यांचे आबादी प्लॉटवरील महसूल प्रशासनाच्या वतीने घर पाडण्यात आले. त्यांच्या हक्काचा निवारा उध्वस्त केला गेला. त्यामुळे शिवलाल त्यांची पत्नी असुविधायुक्त ग्रामपंचायतच्या कार्यालयात राहत आहेत. शिवलाल लिल्हारे यांनी आबादी प्लॉटवर घर बांधले तो २०१२ पासून तिथे राहत होता. ग्रामपंचायतच्या नमुना आठ वर भोगवटदार म्हणून त्याचा नावाची नोंद केली गेली. त्याने ग्रामपंचायतचा करही भरला आहे.
महसूल प्रशासनाने एक वर्षाचे वर ताबा असलेल्या जागेवरचे घर पाडले. घराच्या मातीत जिवनावश्यक वस्तूही दाबून टाकल्या. तत्कालीन तहसीलदार सुर्यकांत पाटील यांच्या सुचनेचे पालन केले गेले नाही. घर पाडतानी तीन नोटीस दिल्या नाहीत. तसेच शिवलालला मुदतवाढही दिली गेली नाही. शिवलालनी आबादी प्लॉट मिळावा, यासाठी तहसीलदार मोहाडी यांना अनेकदा मागणी केली. तथापि, त्यांना पट्टा दिला गेला नाही. त्यानंतर घर पाडण्याची चुकीची कारवाई कारवाई केली गेली. आंदोलन, घेराव झाले.
उपविभागीय अधिकारी तोंडगावकर यांच्या उपस्थितीत उपोषण सोडविण्यात आले. विविध मागण्या पुर्ण केल्याचे पत्र तहसीलदार धनंजय देशमुख यांनी दिले.
शिवलाल लिल्हारे यांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करावी. न्याय देण्यात यावा. खोटी तक्रार करणारे तहसीलदार धनंजय देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात यावी. प्रतिनिधी मंडळावर लावलेले गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच चुकीची कारवाई करणारे नायब तहसीलदार कातकडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. अन्यथा २४ जून रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला जाईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे.
शिष्टमंडळात माधवराव बांते, विजय शहारे, डॉ. पंकज कारेमोरे, राजू कारेमोरे, किरण अतकरी, कमलाकर निखाडे, डॉ. सुनिल चवळे, अनिल काळे, सलिम शेख, नरेश डहारे आदींचा समावेश होता.
‘त्या’ बालकांचे उपोषण सुरुच
सिरसोली येथील शिवलाल लिल्हारे यांच्या दोन मुलांचे दहा दिवसापासून साखळी उपोषण सुरुच आहे. अजूनही प्रशासनाने कोणताच तोडगा काढला नाही. शिवलाल लिल्हारे यांचे महसुल प्रशासनाने घर पाडल्यानंतर लिल्हारे दाम्पत्य बेघर झाले. हक्काचा निवारा मिळावा यासाठी शिवलालची सतीश व समीर ही किशोवयीन बालके मोहाडी तहसील कार्यालयासमोर दहा दिवसापासून साखळी उपोषणावर बसली आहेत. तहसीलदार यांनी पाडलेल्या घराचा पट्टा देण्यासाठी जाहीरनामा काढला होता. त्याची मुदत संपली. त्यानंतर गावातील काही आक्षेप आले. त्यामुळे त्या जागेचा पट्टा शिवलालला लिल्हारे यांना मिळणार काय, या विषयी साशंकता निर्माण झाली आहे. सिरसोलीच्या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे.
तहसील कार्यालयाकडून उपविभागीय अधिकारी तुमसर यांचेकडे सिरसोली येथील शिवलाल लिल्हारे यांच्या आबादी प्लाटसंबधी प्रकरण पाठविले आहे.
-धनंजय देशमुख, तहसीलदार, मोहाडी.