देशपातळीवरील खेळाडू तयार व्हावे
By admin | Published: January 31, 2016 12:34 AM2016-01-31T00:34:47+5:302016-01-31T00:34:47+5:30
भंडारा अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे. याच मातीतून देशपातळीवरील खेळाडू तयार व्हावेत, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे यांनी व्यक्त केले.
नगराध्यक्ष चषकाचे उद्घाटन : नाना पंचबुद्धे यांचे प्रतिपादन
भंडारा : भंडारा अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे. याच मातीतून देशपातळीवरील खेळाडू तयार व्हावेत, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे यांनी व्यक्त केले.
नगरपरिषद भंडारा व तरुणाई सेवा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर डॉ. प्रकाश मालगावे, जुगल भोंगाडे, सुनिल मेंढे, विनयमोहन पशिने, भगवान बावनकर, निलू अवघाते, हिवराज उके, रुपेश टांगले उपस्थित होते.
यावेळी डॉ. प्रकाश मालगावे यांनी, बौद्धिक क्षमता व शारीरिक क्षमता या दोन्ही आवश्यक आहेत. मानवाच्या सर्वांगिण विकासाकरिता खेळ महत्वाचे आहे. उद्घाटनप्रसंगी गुणवंत खेळाडूंचे सत्कार करण्यात आले. यात प्रामुख्याने चौथ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या व अनेक खेळात प्राविण्य मिळविणाऱ्या विकास मारोती खराबे यांचा सत्कार करण्यात आला. शालेय मॉन्टेक्स बॉल स्पर्धेकरिता राज्यस्तरीय कामगिरी केल्याबद्दल आकांक्षा साठवणे, राष्ट्रीय खेळाडू ज्योत्स्ना बानासुरे, तैराकी मध्ये प्राविण्य प्राप्त करणारी सिद्धी मदनकर हीचा सत्कार करण्यात आला.
कबड्डीमध्ये घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करून आॅल इंडिया युनिव्हर्सीटी मध्ये कलर कोड प्राप्त करणाऱ्या सिरसम यांचा समावेश आहे. सदर टेनिक बॉल क्रिकेट स्पर्धा ३० जानेवारी ते ७ फेब्रुवारीपर्यंत रेल्वे ग्राऊंड, माधव नगर खात रोड येथे आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेमध्ये मध्यप्रदेश, महाराष्ट्र व छत्तीसगड खेळाडू राहणार आहेत. प्रामुख्याने छिंदवाडा, परासिया, भिलाई, बिलासपूर, गोंदिया, देवरी, नागपूर, रामटेक, उमरेड, पौनी, तुमसर, साकोली, लाखनी, भंडारा येथील चमूंनी भाग घेतला आहे.
प्रास्ताविक व संचालन महेंद्र निंबार्ते यांनी केले. यावेळी गणेश खोडे, उमेश काकडे, अन्वेष मेंढे, अमित गोन्नाडे, सचिन बांते, रुपेश सोनवाने उपस्थित होते. आभार ललीत भोयर यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)