तालुकानिहाय विकास आराखडा तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:38 AM2021-09-26T04:38:28+5:302021-09-26T04:38:28+5:30
उन्हाळ्याच्या कालावधीत ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण होते. त्याअनुषंगाने पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव तयार करा व बंद असलेल्या योजना सुरू करण्याच्या ...
उन्हाळ्याच्या कालावधीत ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण होते. त्याअनुषंगाने पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव तयार करा व बंद असलेल्या योजना सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिले. बंधारे बांधून पाणी पातळी वाढवता येईल, त्याअनुषंगाने सर्व विभागांनी कार्यवाही करावी व कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले.
खरीप हंगामात सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकावर प्रादुर्भाव झाल्याच्या अनेक तक्रारी येत असून, त्यावर उपाय योजना करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या. धान पिकावर खोडकिडा व इतर रोगांच्या अनुषंगाने औषधसाठा उपलब्धतेचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. रासायनिक खतांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. रासायनिक खतांचा काळाबाजार करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आल्याचे कृषी विभागातर्फे बैठकीत सांगितले. तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव आता नसला तरी पुढील काळात आल्यास त्यावर उपाय योजना करण्यात याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
ई-पीक पाहणी, पीक विमा योजना, एमएसईबी, वन विभाग व धान खरेदी या विभागांचा सुद्धा आढावा घेतला. यावेळी साकोली, लाखनी व लाखांदूर तालुकानिहाय जलसंधारण अंतर्गत सिंचन आराखडा माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आमदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले.