अध्यक्ष, सचिवाला न्यायालयीन कोठडी
By admin | Published: September 25, 2015 12:09 AM2015-09-25T00:09:28+5:302015-09-25T00:09:28+5:30
उमरझरी येथील ग्राम विकास समितीत (ईडीसी) ९ लाख २७ हजार रुपयाचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी ...
कारवाई : प्रकरण उमरझरी येथील ईडीसीचे
साकोली : उमरझरी येथील ग्राम विकास समितीत (ईडीसी) ९ लाख २७ हजार रुपयाचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटकेतील अध्यक्ष अशोक पर्वते व सचिव वनरक्षक एम.जे. पारधी यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
नागझिरा व नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पाचे सहाय्यक वनरक्षक अशोक खुणे यांच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी समितीचे अध्यक्ष पर्वते व सचिव पारधी यांना २२ रोजी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने दोघांनाही २४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीसीमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे गरजू लाभार्थी शासकीय लाभापासून वंचित असून वरिष्ठांनी वेळीच लक्ष दिले असते तर लाभार्थी लाभापासून वंचित राहिले नसते. त्यामुळे सदर रकमेची भरपाई गैरव्यवहार करणाऱ्यांकडून वसुल करुन लाभार्थ्यांना लाभ देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)