अध्यक्ष तिवारी, सचिव चव्हाण विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:41 AM2021-08-14T04:41:01+5:302021-08-14T04:41:01+5:30
निवडणुकीत एकूण १९ उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यात अध्यक्ष पदाकरिता तीन उमेदवार उभे होते. यामध्ये आर.के. तिवारी यांनी त्यांचे ...
निवडणुकीत एकूण १९ उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यात अध्यक्ष पदाकरिता तीन उमेदवार उभे होते. यामध्ये आर.के. तिवारी यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी प्रवीण भोले यांना ७१ मतांनी पराभूत करून यश प्राप्त केले. तिवारी यांनी २२४ मते प्राप्त करून विजय मिळविला. कार्याध्यक्ष पदासाठी जी.जी. घुमळे यांनी सर्वाधिक २६१ मते प्राप्त करून रोखपाल सुलाखे यांना १२७ मतांनी पराजित केले. उपाध्यक्षपदासाठी तीन उमेदवार रिंगणात होते. त्यात अरुण बोपचे यांनी २२० मते प्राप्त करून रमेश साकुरे यांना ६१ मतांनी पराजित केले. सरचिटणीसपदाकरिता विजय चव्हाण यांनी २१७ मते प्राप्त केली व प्रदीप कांबळे यांना ३६ मतांनी पराजित केले. सहसचिवपदाकरिता महेंद्र कटरे यांनी २४२ मते प्राप्त करून प्रफुल्ल खोब्रागडे यांना ८५ मतांनी हरविले. संघटन सचिवपदासाठी तीन उमेदवार रिंगणात होते. त्यात संतोष गायकवाड यांनी २३६ मते मिळविली व हेमंत टेभरेला ७७ मतांनी पराजित केले. कोषाध्यक्षपदासाठीसुद्धा तीन उमेदवार रिंगणात होते. त्यात एस.व्ही. थोटे यांनी २११ मते घेऊन मुकेश गोंधुळे यांना ५७ मतांनी मागे टाकून विजय मिळविला. निवडणूक प्रक्रिया २ ऑगस्टला सुरू झाली. त्यानंतर ७ ऑगस्टला गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले. त्यात एकूण ४०४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, तर चार कर्मचारी अनुपस्थित होते. या प्रक्रियेत मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून गुणवंत कामगार व पंतप्रधान श्रमवीर पुरस्कारप्राप्त प्रमोद नागदेवे यांनी कार्य सांभाळले. त्याचप्रमाणे रमेश कुसुंबे, अनिल वनवे, देवीदास नांदे व संतोष येरपुडे यांनी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून कार्य केले.