बैलजोडीला आले सोन्याचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:06 AM2021-02-21T05:06:44+5:302021-02-21T05:06:44+5:30

जिल्ह्यातील सर्वांत मोठा मानल्या जाणाऱ्या भंडारासह कोंढा (कोसरा), मासळ यासह अनेक ठिकाणी बाजार भरतो. सध्या भंडारा येथील बाजारात रविवारी ...

The price of gold came to the bull pair | बैलजोडीला आले सोन्याचा भाव

बैलजोडीला आले सोन्याचा भाव

Next

जिल्ह्यातील सर्वांत मोठा मानल्या जाणाऱ्या भंडारासह कोंढा (कोसरा), मासळ यासह अनेक ठिकाणी बाजार भरतो. सध्या भंडारा येथील बाजारात रविवारी दमदार बैलजोडीला एक लाखावरचा दर मिळत असल्याचे दिसून आले. भंडारा येथील गुरांच्या बाजारात भंडारा जिल्ह्यासह विदर्भातील शेतकरीही गुरांच्या खरेदीसाठी येतात. त्यामुळे या बाजारात दर रविवारी लाखोंची उलाढाल बैलांच्या खरेदी-विक्रीतूनच होते. भंडारा जिल्ह्यातील भंडारा, कोंढा कोसरा, लाखनी, मासळ बाजारातील उलाढाल वाढली आहे.

बॉक्स

जनावरे सांभाळणे झाले कठीण

पूर्वी गुरांचा गोठा नाही असा शेतकरी मिळणे कठीण होते; परंतु गुरांच्या चाऱ्यासह विविध गोष्टींसाठी लागणाऱ्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. भाकड जनावरांची समस्याही आता गुरे पाळण्याचा विचारही करणे अशक्य आहे.

यादोराव नंदेश्वर, शेतकरी.

चाऱ्याचा मोठ्या प्रमाणात असलेला तुटवडा, तसेच गुरांची देखभाल करण्यासाठी द्यावा लागणारा वेळ, या गोष्टी अडचणीच्या ठरत आहेत. वातावरणातील बदलामुळे वाढत असलेल्या आजारांमुळे गुरे पाळणे आता कठीण होऊन बसले आहे.

विलास पेशने, शेतकरी

गत काही वर्षांपासून चाऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. कडबा मिळणे दुरापास्त असून, कुटाराचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बैलांसाठी पुरेसा चारा असणे आवश्यक आहे. त्यामुळे एकंदरीत गुरे पाळणे ही समस्याच झाली आहे.

सुधाकर वघारे, शेतकरी

बॉक्स

१५ लाखांची उलाढाल

भंडारा जिल्ह्यातील भंडारा येथील गुरांच्या बाजारात लाखांदूर, साकोली, लाखनी, पवनी, तुमसर, मोहाडी तालुक्यातील शेतकरी गुरांच्या खरेदीसाठी येतात. यासह मध्यप्रदेशातून, तसेच पूर्व विदर्भातून मोठ्या प्रमाणात गोपालक येत असतात. याठिकाणी गाय, बैल, म्हैस या जनावरांची खरेदी-विक्री होते. यातून दर आठवड्याला दहा ते पंधरा लाखांच्या वर उलाढाल होत असते. त्यात बैलांसह म्हशीच्या किमती अधिक असल्याने प्रामुख्याने या दोन वर्गातील गुरांची खरेदी-विक्री तिथूनच अधिक उलाढाल होत असल्याचे दिसून येते.

बॉक्स

दुधाळ जनावरांची मागणी घटली

-चाऱ्याची टंचाई आणि संगोपन यावरील खर्च त्यामुळे गुरे पाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे दुधाळ जनावरांची मागणी घटली आहे.

-गायीचे पोषण, देखभाल चारा आणि आजारांवरील उपचाराचा वाढलेला खर्च पाहता गायी पाळण्याबाबत पशुपालक उदासीन आहेत.

-एकीकडे गुरांच्या खर्चात वाढ झाली असताना दुधाचे दर मात्र जेमतेम ५० रुपये लिटरपर्यंतच आहेत. त्यामुळे दुधाळ जनावरांच्या मागणीत घट झाली आहे.

बॉक्स

बैलजोडीवर दिवसा १५० रुपये खर्च

आधीच चाऱ्याचे दर वाढले असताना बैलांच्या देखभालीसाठी ठेवल्या जाणाऱ्या गड्याची मजुरी वाढली आहे. त्यामुळे एका बैलजोडीसाठी कडबा, कुटार आदी गड्याच्या मजुरीसह इतर खर्च मिळून शेतकऱ्यांना दीडशे रुपये खर्च येत आहे.

Web Title: The price of gold came to the bull pair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.