व्यक्तींची किंमत पैशाने नव्हे गुणाने व्हावी
By admin | Published: February 7, 2015 12:22 AM2015-02-07T00:22:51+5:302015-02-07T00:22:51+5:30
विद्यार्थ्यांनी स्वत:च्या जीवनाचे स्वत:च शिल्पकार बनावे, स्वप्न पाहा, कर्तव्य करा व जीवनाचे सोने करा याकरीता पैसे घेवून कामे करून नका.
जवाहरनगर : विद्यार्थ्यांनी स्वत:च्या जीवनाचे स्वत:च शिल्पकार बनावे, स्वप्न पाहा, कर्तव्य करा व जीवनाचे सोने करा याकरीता पैसे घेवून कामे करून नका. श्रमाने आपला गुणांची वाढ करा. परिणामी व्यक्तींची किंमत पैशाने नव्हे गुणाने होते, असे प्रतिपादन नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निशा सावरकर यांनी केले.
ग्रामविकास आर्टस अॅन्ड सायन्स ज्युनिअर कॉलेज कोंढी जवाहरनगरद्वारे श्रम संस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी निशा सावरकर बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वंदना वंजारी उपस्थित होते. अतिथी सरपंच मिरा सुखदेवे, टेकचंद सावरकर, रविंद्र वंजारी, महादेव वाडीभस्मे, कृष्णा लांजेवार, रामकुमार गजभिये, प्रेम वनवे, सरपंच अरुण कारेमोरे, नाना कारेमोरे, वासुदेव गजभिये, प्राचार्य एम.एम. मेश्राम, मुख्याध्यापक पी.एस. नागदेवे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी शारीरिक श्रमाने, ग्रामसफाई, प्रभातफेरी, विविध समस्यांतून विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. याप्रसंगी मान्यवरांना मानंवदना देण्यात आली. याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना शिबिर कसे यशस्वी होईल याबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य एम.एम. मेश्राम यांनी केले. संचालन एस. डब्ल्यु. मडामे यांनी केले. आभार शिबिर प्रमुख व्ही.बी. जाधव यांनी मानले. (वार्ताहर)