बोंडगावदेवी येथे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस जोडणीचे वाटप
By admin | Published: October 29, 2016 12:38 AM2016-10-29T00:38:48+5:302016-10-29T00:38:48+5:30
स्थानिक बीपीएल लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना अंतर्गत अर्जुनी-मोरगाव येथील खाजगी गॅस ...
ंलाभार्थ्यांना मिळाला लाभ
बोंडगावदेवी : स्थानिक बीपीएल लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना अंतर्गत अर्जुनी-मोरगाव येथील खाजगी गॅस एजंसीमार्फत ग्रामपंचायत सदस्य दिनेश फुल्लूके यांच्या हस्ते गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले.
एका साध्या सभारंभाने आयोजित गॅस-चुला वितरण सभारंभाप्रसंगी गावातील पारितोषीक प्राप्त महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष दिनेश फुल्लूके, युवा संघटक अनिल ठवरे, मारोती रामटेके, राजेंद्र मेश्राम, भाष्कर ठवरे, जयपाल शहारे, ईन्डेन गॅस वितरकचे व्यवस्थापक प्रदीप कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य दिनेश फुल्लूके यांच्या हस्ते पात्र बीपीएलधारक लाभार्थ्यांना गॅस, शेगडीसह कनेक्श्नचे वाटप करण्यात आले.
गाव पातळीवरील सर्वसामान्य जनतेला भारत सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा लाभ मिळणे सहज श्क्य व्हावे म्हणून सामाजिक बांधिलकी जपून अमर ठवरे यांनी बीपीएल धारकांचे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरुन घेतले होते. गरिबांच्या घरी गॅस चुला पेटवार म्हणून त्यांनी पात्र लाभार्थ्यांचे अर्ज अर्जुनी मोरगावच्या ईन्डेन गॅस एजंसीमध्ये स्वत: पोहचवून दिले होते. ईन्डेन गॅसचे संचालक आनंद चांडक, व्यवस्थापक प्रदीप कांबळे, अशोक चांडक यांनी पात्र लाभार्थ्यांना अल्पश: शंभर रुपयात दिवाळीच्या सणासमोर गॅस कनेक्शन उपलब्ध करुन लाभार्थ्यांच्या घरात गॅस चुला पेटवून दिला. महिला लाभार्थ्यांनी गॅस सेवा घरापर्यंत उपलब्ध करुन धुरापासून दुर राहण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल खाजगी गॅस वितरकाचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे संचालन जयंत ठवरे यांनी केले. तर आभार आकाश फुल्लूके यांनी मानले. तालुक्यातील ज्या पात्र बीपीएल धारकांनी आवश्यक कागदपत्रासह विहित नमुन्यात अर्ज केला त्यांना लवकर घरपोच गॅस कनेक्शन पुरविण्यात येईल असे अशोक चांडक यांनी सांगितले. इतर गावांमध्ये फक्त शंभर रुपयात गॅस शेगडी पोहोचविण्याच्या कामाला गती आल्याचे गॅस एजंसीमार्फत सांगण्यात आले. (वार्ताहर )