शाळाबाह्य मुलांचा प्राधान्याने शोध घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:06 AM2021-03-04T05:06:35+5:302021-03-04T05:06:35+5:30
यावेळी बैठकीला शिक्षणाधिकारी (माध्य) एस. व्ही. डोर्लीकर, शिक्षणाधिकारी (प्राथ) मनोहर बारस्कर, आदिवासी विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी एन. डी. झाडे, ...
यावेळी बैठकीला शिक्षणाधिकारी (माध्य) एस. व्ही. डोर्लीकर, शिक्षणाधिकारी (प्राथ) मनोहर बारस्कर, आदिवासी विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी एन. डी. झाडे, समाजकल्याणचे सहआयुक्त आर. जी. बुजाडे, सरकारी कामगार अधिकारी म. प्रा. गांगुर्डे, जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण समग्र शिक्षा विलास गोंदाळे यांची उपस्थिती होती. प्रत्येक शाळा, गाव अंगणवाडी निहाय माहिती संकलित करण्यासाठी जनरल रजिस्टर, विद्यार्थी हजेरीपत्रक व गाव पंजीका पडताळणी करुन अद्ययावत करण्यात याव्यात. या सोबतच गरजाधिष्ठित बालके म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांचे सुध्दा सर्वेक्षण करावे. जिल्ह्यातील बऱ्याच आदिवासी गावांमध्ये विद्यार्थी शाळेत जात नाही. तसेच वाड्या, तांडे व भटक्या जमातीतील मुले शाळेत नियमित जात नाहीत त्या विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहण्याकरिता प्रयत्न करण्यात यावेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.