पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून लसीकरणात प्राधान्य द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:38 AM2021-05-20T04:38:23+5:302021-05-20T04:38:23+5:30
कोरोना संक्रमणाची दाहकता बघता सर्व नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात नागरिकांना या गंभीर आजाराचा धोका कमी होण्यास ...
कोरोना संक्रमणाची दाहकता बघता सर्व नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात नागरिकांना या गंभीर आजाराचा धोका कमी होण्यास मदत होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना काळात जे पुढे येऊन आपले कर्तव्य निभावत आहेत. असे सर्व पत्रकार इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांचे प्रतिनिधी, त्यांचे कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे प्राधान्याने लसीकरण केले पाहिजे. कोरोना साथीच्या काळात रुग्णालयात जाऊन, स्मशानभूमीत जाऊन, जनसामान्यांच्या व्यथा मांडण्यासाठी त्यांच्याशी थेट संवाद साधून पत्रकार बांधव या काळात काम करीत आहेत.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागरण करण्यात पत्रकारांचा आणि माध्यमांचा मोठा वाटा आहे. कोरोना संक्रमित झालेल्या पत्रकारांची संख्या तर अतिशय मोठी आहे. त्यामुळे सर्व पत्रकार तथा इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांचे पत्रकार, कर्मचारी यांच्यासह त्यांच्या परिवारास प्राधान्य क्रमाने लस देण्यासंदर्भातील निर्णय शासनाने तत्काळ आणि विनाविलंब करावा, अशी मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख अमित मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, निखिल कटारे, अतुल साखरवाडे यांच्यासह शिवसैनिकांनी केली आहे.