बंदिवानांचे पुनर्वसन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 10:56 PM2017-09-05T22:56:48+5:302017-09-05T22:57:07+5:30

कारागृहात बंदिवान असणाºया व्यक्तीसाठी शासनातर्फे विविध सोयी सुविधा व सवलती पुरविल्या जातात.

The prisoners will be rehabilitated | बंदिवानांचे पुनर्वसन होणार

बंदिवानांचे पुनर्वसन होणार

Next
ठळक मुद्देकारागृह अधीक्षक अनुप कुमरे : जिल्हा कारागृहात संवादपर्व कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कारागृहात बंदिवान असणाºया व्यक्तीसाठी शासनातर्फे विविध सोयी सुविधा व सवलती पुरविल्या जातात. बंद्यांचे मानवी हक्क, शिक्षा, तडजोड, शेती व्यवसाय, बंद्यांचे गाºहाणे ऐकणे, आरोग्य सुविधा, समुपदेशन, योगाभ्यास, शेतीपूरक जोडधंदे व उद्योग व्यवसाय प्रशिक्षण आदि योजना कारागृहात राबविल्या जातात. या योजनांचा बंदीवानांनी लाभ घेऊन आपले जीवन सुकर करावे, असे आवाहन जिल्हा कारागृह अधीक्षक अनुप कुमरे यांनी केले.
जिल्हा कारागृह येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित संवादपर्व कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तुरुंगाधिकारी रमेश मेंगळे, सुनिलदत्त जांभुळे आदी उपस्थित होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेवर आधारित ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. संवादपर्व हा महत्वाचा कार्यक्रम असून त्याद्वारे शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्यास मदत होते. कारागृहात वृत्तपत्र वाचनाअभावी शासनाच्या योजनेची माहिती होत नाही. त्यासाठी हे संवादपर्व उपयुक्त आहे. बंदिवानाच्या पुनर्वसनाच्या अनेक योजना शासनाने तयार केल्या असून पुनर्वसनासाठी शासन सदैव प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने मागील महिन्यात आयोजित व्यवसाय प्रशिक्षणाचा उपयोग येथून निघाल्यानंतर त्यांची बांधणी व नियोजन करावयाचे आहे. तसेच व्यवसायाबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून कर्जाबाबत नियोजन करण्यात येणार आहे. तसेच १ लाख ५० हजार रुपये कर्ज आपणास मंजूर करून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. असे कुमरे यांनी सांगितले. बंदिवानापैकी २७ बंदिवानाची निवड करण्यात येऊन त्यातील होतकरू १५ जणांना पहिल्या टप्प्यात हे कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे,असेही त्यांनी सांगितले.
कारागृहातील अडचणी बंदिवानांनी सांगाव्यात तसेच येथून गेल्यानंतर चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. चांगल्या गोष्टी आत्मसात करा. जैविक शेतीच्या योजना आपल्या फायद्याच्या आहेत. त्यांचा अंगीकार करा. या ठिकाणाहून बाहेर गेल्यानंतर शासनाच्या विविध योजनांची माहिती घेवून आपले जीवन समृद्ध करावे तसेच चांगले व्यक्ती बनण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी शासकीय योजनांची विस्तृत माहिती देताना जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते यांनी अवयवदान, बेटी बचाव बेटी पढाव, प्रधानमंत्री मुद्रा योजना, महिला आर्थिक विकास महामंडळ योजना, शेतीपूरक योजना, आरोग्य विभागाच्या योजना, सेवा हमी कायदा या योजनांची त्यांनी याप्रसंगी माहिती दिली. या योजनांचा लाभ घेऊन आपले जीवन समृद्ध करा, असे त्यांनी सांगितले. शासनातर्फे बंदिवानासाठी उपयुक्त असे प्रशिक्षण कारागृहात आयोजित केले. या प्रशिक्षणामुळे स्वत:चा लघु उद्योग उभा करण्याची उमेद बंदिवानात जागविण्यात आली. संवादपर्व आणि प्रशिक्षण उपयुक्त असे उपक्रम असून अशा प्रकारचे उपक्रम बंदिवानांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येतात.

Web Title: The prisoners will be rehabilitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.