जिल्हा रुग्णालयासह खासगी दवाखाने हाऊसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:34 AM2021-04-15T04:34:01+5:302021-04-15T04:34:01+5:30
दररोज रुग्णसंख्या वाढत असल्याने नातेवाईक जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. मात्र तेथील अवस्था पाहता बेड मिळणे कठीण जाते. अनेक ...
दररोज रुग्णसंख्या वाढत असल्याने नातेवाईक जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. मात्र तेथील अवस्था पाहता बेड मिळणे कठीण जाते. अनेक ज्येष्ठांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना घेऊन आलेली मंडळी रुग्णालयात या वॉर्डातून त्या वॉर्डात भटकंती करताना दिसतात. परंतु कुठेच बेड रिकामे नसल्याने त्यांच्या पदरी निराशा येते. त्यानंतर शहरातील खासगी रुग्णालयाचा आधार घेतला जातो. परंतु तेथेही बेड रिकामे नसल्याचे सांगितले जाते. गंभीर अवस्थेतील रुग्णाला कुठे दाखल करावे, असा प्रश्न नातेवाईकांपुढे पडलेला असताे. गत आठ दिवसांपासून भंडारा शहराची ही अवस्था झाली आहे. यातून मृत्यूदर तर वाढत नाही ना, अशी शंका निर्माण होत आहे.
बाॅक्स
मृत्यूमागे वेळेवर उपचाराचा अभाव
जिल्ह्यात कोरोना बळींची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक जण कोरोनाची लक्षणे असली तरी चाचणी करून घेण्यास मागेपुढे पाहतात. मात्र प्रकृती बिघडली की मग रुग्णालयात धाव घेतात. तोपर्यंत उशीर झालेला असतो. अलीकडे तर कोरोना बाधित व्यक्तींना बेड मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळेही उपचारात उशीर होत आहे. मानसिकदृष्ट्या रुग्ण खचत असून त्यामुळे मृत्यूच्या दारात जात तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.