तुमसरच्या बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दुरावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:20 PM2019-05-21T23:20:00+5:302019-05-21T23:22:02+5:30
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे तुमसर पंचायत समिती कार्यालयाच्या दर्शनी भागातील लाखोंच्या उद्यानाची सध्या दूरावस्था झाली आहे. येथील महागडे गवत आगीत स्वाहा झाले आहे. दर्शनी भागात सात हजारांचे एलईडी लाईट उधारीवर बाबासाहेबांच्या जयंतीदिनी पंचायत समिती सदस्यांनी खरेदी करून लावले. त्याचे बिल अद्याप मंजूर झाले नाही. भीषण उष्णतेत उद्यानातील झाडे शेवटची घटका मोजत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे तुमसर पंचायत समिती कार्यालयाच्या दर्शनी भागातील लाखोंच्या उद्यानाची सध्या दूरावस्था झाली आहे. येथील महागडे गवत आगीत स्वाहा झाले आहे. दर्शनी भागात सात हजारांचे एलईडी लाईट उधारीवर बाबासाहेबांच्या जयंतीदिनी पंचायत समिती सदस्यांनी खरेदी करून लावले. त्याचे बिल अद्याप मंजूर झाले नाही. भीषण उष्णतेत उद्यानातील झाडे शेवटची घटका मोजत आहेत. ग्रामीण परिसराला न्याय देण्याची ग्वाही सदर कार्यालय देते, परंतु उद्यानाला येथे बचावाकरिता प्रयत्न करताना दिसत नाही.
सुमारे पाच ते सहा वर्षापुर्वी तुमसर पंचायत समिती कार्यालयासमोर लाखो रूपये खर्च करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावाने देखणे उद्यान तयार करण्यात आले होते. महामानव डॉ. बाबासाहेबांचा देखना पुर्णाकृती पुतळा येथे लावण्यात आला. फुलझाडे, महागडे गवत येथे लावण्यात आले. पंचायत समिती कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्यांचे सदर उद्याण लक्ष वेधून घेत होते. परंतु सध्या सदर उद्यानाची दूरावस्था झाली आहे. येथील महागडे गवताला कुणीतरी आग लावली आहे. अर्धे गवत जळालेल्या स्थितीत आहे. फुलझाडे व इतर नाजूक झाडे शेवटची घटका मोजत आहेत. सध्या तीव्र उन्हाळा असून त्याचा फटका उद्यानातील झाडांना बसत आहे. उद्यानाच्या बचावाकरीता काही ठोस कारवाई येथे करताना कुणी दिसत नाही.
झाडे लावा, झाडे जगवा असे संदेश केंद्र व राज्य शासन प्रत्येक गावात देत आहे. ग्रामीण परिसरातील तालुका मुख्यालय असलेल्या पंचायत समिती कार्यालयासमोरील उद्यानाकडे दुर्लक्ष केले जात आहे. उद्यानातील एलईडी लाईट निकामी झाले होते. १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या जयंतीदिनी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे व त्यांच्या सहकारी सदस्यांनी सात हजारांचे एलईडी लाईट उधारीवर खरेदी करून आणले. त्याचे बिल येथे अजून देण्यात आले नाही. अंधारातून प्रकाशाकडे नेणाºया महामानवालाच येथे अंधारात ठेवले जात होते. ही मोठी शोकांतिका आहे. तालुक्याचे कागदपत्रे, दप्तर येथे यामुळे सुरक्षीतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
वृक्षांना वाचविण्याचे आवाहन
भीषण उन्हात फुलझाडे व इतर झाडांना दररोज टँकरने पाणीपुरवठा करून झाडांना वाचविण्याकरिता पंचायत समिती प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे. निधीची कुरकुर करता कामा नये, उद्यान बाचावाकरिता पं.स. कार्यालयाने किमान वर्गणी येथे काढून तालुक्यात चांगला संदेश द्यावा, केवळ कागदोपत्री कामे केल्याने ग्रामीण भागात संदेश जाणार नाही. लाखो रूपये खर्च करूनहे उद्यान तयार करण्यात आले. याचे भान ठेवण्याची खरी गरज आहे. तत्कालीन प्रभारी खंडविकास अधिकारी डॉ. शांताराम चाफले यांच्या कार्यकाळात सदर उद्यान तयार करण्यात आले होते हे विशेष. उद्यानाची दूरावस्था थांबवावी, अशी मागणी पं.स. सदस्य हिरालाल नागपुरे, राकाँचे तालुकाध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे यांनी केली आहे.
पंचायत समिती कार्यालयासमोरील उद्यानाची दूरावस्था झाली असून एलईडी लाईटचे बिल अजून देण्यात आले नाही. उद्यान बचावाकरिता अधिकारी व कर्मचाºयांनी प्रयत्न करावा.
-हिरालाल नागपुरे, पं.स. सदस्य तुमसर.
एलईडी लाईट खरेदी केल्याचे बिल पंचायत समितीच्या मासिक सभेत पं.स. सदस्यांनी ठेवावे. मासिक सभेत त्यावर चर्चा करून तोडगा काढण्यात येईल. पाण्याचे टँकरबाबत निर्णय घेण्यात येईल.
-ए.पी. मोहोड, खंडविकास अधिकारी तुमसर.