ज्येष्ठ नेत्यांच्या समोर मांडल्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 10:15 PM2019-01-03T22:15:07+5:302019-01-03T22:15:36+5:30

भंडारा जिल्ह्यासह सिहोरा परिसरात असणाऱ्या समस्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे सभापती धनेंद्र तुरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना दिले. याशिवाय त्यांनी या विषयावर विस्तृत चर्चा केली.

Problems presented before senior leaders | ज्येष्ठ नेत्यांच्या समोर मांडल्या समस्या

ज्येष्ठ नेत्यांच्या समोर मांडल्या समस्या

Next
ठळक मुद्देपाणी, रोजगार, धानाचे प्रश्न : धनेंद्र तुरकर यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : भंडारा जिल्ह्यासह सिहोरा परिसरात असणाऱ्या समस्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे सभापती धनेंद्र तुरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना दिले. याशिवाय त्यांनी या विषयावर विस्तृत चर्चा केली. या चर्चेत पाणी, पर्यटन, रोजगार आणि धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी मांडले.
गोंदिया जिल्ह्यात कँसर रुग्णालयाचे उद्घाटन कार्यासाठी ज्येष्ठ नेते खा.शरद पवार आणि खा. प्रफुल्ल पटेल होते. या ज्येष्ठ नेत्यांचे सोबत सभापती धनेंद्र तुरकर यांनी विविध समस्यांवर चर्चा केली. या सोबत सिहोरा परिसरात असणारी बारमाही सिंचनाची सोय करण्यासाठी चर्चा केली. बावनथडी नदीवरील सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प चांदपूर जलाशयात पाणी उपसा करण्यास असमर्थ ठरत आहे. प्रकल्प सुरु असताना नदीचे पात्र आटले जात आहेत. यामुळे उन्हाळी धानपिकांना पाणी मिळत नाही. राजीव सागर धरणाचे पाणी चांदपूर जलाशयाला मिळत नाही. वैनगंगा नदीचे पात्रात पाणीच पाणी असताना जलाशयात उपसा करण्याचे योजना नाहीत.
यामुळे खरीप हंगामात धानाचे उत्पादन घेतल्यानंतर शेतकºयांकडे सिंचनाची सोय नसल्याने ८ हजार हेक्टर आर शेती ओलीताखाली आणता येत नाही. यामुळे उन्हाळी धानाचे पीक घेता येत नसल्याने रोजगार अभावी शेतकºयांची मुले रोजगाराकरिता शहरात पलायन करीत आहेत. वर्षभर सिंचनाची सोय झाली तर कुणी परिसर रोजगाराकरिता सोडणार नाही. आघाडी शासनाचे काळात जिल्ह्यात ग्रीन व्हॅली चांदपूर या एकमेव पर्यटनस्थळाला मंजुरी देण्यात आली होती. परिसरात या पर्यटनस्थळाचे अर्थव्यवस्था सावरली होती.
अनेकांनी गाव आणि गावाबाहेर व्यवसाय थाटले होते. पर्यटनस्थळात १०० हून अधिक बेरोजगार तरुण अस्थायी कामगार म्हणून कार्यरत होते. परंतु पर्यटनस्थळ बंद होताच रोजगारांचे गणित गडगडले. व्यवसाय बंद झाल आहेत. बेरोजगारांना रोजगाराची समस्या निर्माण झाल्याने त्यांचे शहरात पलायन सुरु झाले आहे. राज्यस्तरीय दालनात सुटणारी समस्या निकाली काढण्यात आली नसल्याने अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. याशिवाय रस्त्याचे रुंदीकरण अडली आहे. परिसरात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी बारमाही सिंचन सुविधा आणि पर्यटन विकासाला जलद गतीने मंजुरी दिली पाहिजे. असे निवेदनात सभापती धनेंद्र तुरकर यांनी नमूद केले.

Web Title: Problems presented before senior leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.