कोपर्डी घटनेचा केला निषेध
By admin | Published: October 5, 2016 12:37 AM2016-10-05T00:37:53+5:302016-10-05T00:37:53+5:30
अहमदनगर तालुक्यातील कोपर्डी येथे मराठा समाजाच्या मुलीवर अन्याय करण्यात आला.
मराठा समाजाचे निवेदन : आरोपींना कठोर शिक्षेची मागणी
भंडारा : अहमदनगर तालुक्यातील कोपर्डी येथे मराठा समाजाच्या मुलीवर अन्याय करण्यात आला. याप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, या मागणीला घेवून भंडारा येथील मराठा समाजाच्या शिष्टमंडळाच्या जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिले. या घटनेचा तीव्र शब्दात मराठा समाजाने निषेध व्यक्त केला.
औरंगाबाद जिल्ह्यातील कोपर्डी येथे मराठा समाजाच्या मुलीवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा यासाठी राज्यपातळीवर आंदोलने सुरू आहेत. यात तालुकापासून जिल्हास्तरावर निवेदने दिली जात आहेत. यात आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, एट्रॉसिटी कायद्यात संशोधन करण्यात यावे, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीला घेवून मराठा समाजातर्फे राज्यभर मुकमोर्चा काढला जात आहे. याचे पडसाद भंडारा जिल्ह्यातही उमटले.
समाजातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी अनुराधा माने, वंदना मोहिते, शितल कोल्हे, मंगला कोल्हे, संजय मोहिते, संजय माने, मंगेश कोल्हे, मार्तंड शिंदे, प्रविण कोल्हे, वंदना घाडगे, ज्योती शिंदे, सारिका मोरे, वामनराव कडू, तेजस कडू, ममता कापसे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)